Omicron विरुद्ध लढण्यासाठी Covaxin लस अधिक प्रभावी असू शकते: जाणून घ्या तज्ज्ञांचे मत Saam Tv
देश विदेश

Omicron विरुद्ध लढण्यासाठी Covaxin लस अधिक प्रभावी असू शकते: जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

कोरोना व्हायरसच्या (Covid) नवीन व्हेरिएंट 'ओमिक्रॉनने (Omicron Variant) जगभरामध्ये लोकांची चिंता वाढवली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : कोरोना व्हायरसच्या (Covid) नवीन ओमिक्रॉनने व्हेरिएंट(Omicron Variant ) जगभरामध्ये लोकांची चिंता वाढवली आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये हा व्हेरिएंट आढळून आल्यावर जगभरात मोठ्या प्रमाणात खळबळ माजली आहे. अशा परिस्थितीत सध्या कोरोनावर जी लस वापरली जात आहे, ती ओमिक्रॉनलाही प्रतिरोधक आहे का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यातच भारत बायोटेकची कोविड लस कोव्हॅक्सिन (Covaxin) ओमिक्रॉन व्हेरिएंटविरुद्ध अधिक प्रभावी ठरू शकणार आहे, असे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) अधिकाऱ्याने माहिती दिली आहे.

हे देखील पहा-

मिळालेल्या माहितीनुसार, इतर उपलब्ध लसींच्या तुलनेमध्ये ओमिक्रॉनच्या विरूद्ध कोव्हॅक्सिन अधिक प्रभावी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोव्हॅक्सिन, एक virion- निष्क्रिय लस संपूर्ण व्हायरस कव्हर करते आणि या अत्यंत उत्परिवर्तित नवीन व्हेरिएंट विरूद्ध कार्य करू शकते, असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. आणखी एका निनावी ICMR अधिकाऱ्याने दिलेल्या रिपोर्टमध्ये सांगितले आहे की, कोव्हॅक्सिन हे अल्फा, बीटा, गामा आणि डेल्टा सारख्या इतर प्रकारांविरूद्ध देखील अधिक प्रभावी असल्याचे आढळून आले आहे. यामुळे आम्ही आशा करू शकतो की ते नवीन व्हेरिएंटविरूद्ध देखील प्रभावी ठरणार आहे. दरम्यान अधिक नमुने प्राप्त होईपर्यंत आणि चाचणी होईपर्यंत अधिकाऱ्याने चुकीची माहिती न पसरवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही अपेक्षा करतो की ती लस संरक्षण प्रदान करणार आहे. एकदा आम्हाला नमुने मिळाल्यावर, आम्ही पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) येथे या लसीच्या परिणामकारकतेची चाचणी करण्यात येणार आहे. वुहानमध्ये सापडलेल्या मूळ प्रकाराविरूद्ध ही लस विकसित केली गेली आहे आणि ती इतर व्हेरिएंट विरूद्ध कार्य करत असल्याचे देखील दाखवून दिले आहे. पुढील संशोधन सुरु असल्याचे एका स्त्रोताचा हवाला देऊन कंपनीच्या रिपोर्टमध्ये सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: घाटकोपर पूर्वमधून पराग शाह विजयी

Eknath Shinde News : हा विजय न भूतो न भविष्यति आहे, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया | VIDEO

Naresh Mhaske: महायुतीचा हा एकतर्फी विजय आहे, नरेश म्हस्के यांनी दिली प्रतिक्रिया| Video

Health tips: दालचिनीचे पाणी प्यायल्यास होतील 'हे' जबरदस्त फायदे

Eknath Shinde: महायुतीच्या विजयानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदेंनी मानले लाडक्या बहीणींचे आभार

SCROLL FOR NEXT