Thalapathy Vijay navigates crucial alliance talks as TVK inches closer to forming the government in Tamil Nadu. saam tv
देश विदेश

थलापतीला पाठिंबा कोणाचा? AIADMK चे 30 आमदार फुटणार?

AIADMK Split Buzz: तामिळनाडूत थलपती विजयनं ऐतिहासिक असा विजय मिळवला... मात्र सत्तेस्थानेसाठी थलपतीला आणखी 10 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे... त्यामुळे काँग्रेस TVK ला पाठिंबा देणार का? काँग्रेसनं TVKपुढे कोणती अट घातली आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजय यांच्या ऐतिहासिक विजयानं तामिळनाडूची राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलून गेलेत..मात्र 108 जागा मिळवत तामिळनाडूत सर्वात मोठा पक्ष झालेल्या TVK ला सत्तास्थापनेसाठी अद्याप 10 आमदारांचा पाठिंबा गरजेचा आहे...अशातच AIADMK च्या आमदारांनी थलपती विजय यांना पाठिंबा देण्यासाठी दंड थोपटलेत...AIADMK च्या 47 पैकी 30 आमदार फुटणार असल्याची चर्चा तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळात रंगलीय...TVK ला पाठिंबा न दिल्यास स्वत: हून पक्षातून बाहेर पडू, असा थेट इशारा AIADMKच्या आमदारांनी पक्षाचे प्रमुख पलानीस्वामी यांना दिलाय...तर दुसरीकडे तामिळनाडूत TVK ला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसनं सकारात्मक भूमिका घेतलीय...मात्र भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना आघाडीत न घेण्याची अट काँग्रेसनं विजय यांच्यापुढे ठेवलीय...

दुसरीकडे TVK ने CPIलाही पाठिंबा देण्याची विनंती केलीय...त्यामुळे थलपतींपुढे सत्ता स्थापनेसाठी कोणते मार्ग आहेत? पाहूयात...

सत्तेचं समीकरण - 1

काँग्रेससारखेच डीएमकेसोबत लढणाऱे डावे आणि दलितांचा पक्ष म्हणून परिचित असलेला VCK हे थलपतींना सत्तास्थापनेसाठी पाठिंबा देऊ शकतात... ज्यामुळे 11 आमदारांच्या मदतीनं TVK 118 चं बहुमत सहज गाठू शकतील...

सत्तेचं समीकरण - 2

दुसरीकडे एआयएडीएकेच्या 47 पैकी 30 आमदारांनी स्वत:हून TVKला पाठिंबा दिला तर विजय सत्तेत बसू शकतात...मात्र निवडणुकीपूर्व भाजप आणि AIADMK ची युती असल्यानं आणि TVK ला भाजप सत्तेत नको असल्यानं TVK आणि AIADMK आघाडी होणं कठीण दिसतंय...

त्यामुळे तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विजय हे विराजमान होणार हे जवळपास निश्चित असलं तरी तामिळनाडू काँग्रेस कमिटीच्या बैठकीत काय निर्णय होतो? याकडे सर्वाचं लक्ष आहे...त्यामुळे TVK विचारसरणीशी तडजोड न करता काँग्रेसशी आघाडी करणार की AIADMKचे आमदार गळाला लावून सत्तास्थपनेचा मार्ग निवडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई इंडियन्सला सर्वात मोठा झटका, हार्दिक पांड्याच्या फिटनेसवर आली महत्त्वाची अपडेट, सूर्याच्या खेळण्यावरही संशय

Maharashtra News Live Update: जुन्नर तालुक्यात बिबट्याचा थरार; दुचाकीवर बसलेल्या १० वर्षीय मुलावर हल्ला

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळला; भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांच्या जवळच्या व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या, घटनाक्रम आला समोर

मंत्री छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? राजकीय घडामोडींना वेग|VIDEO

मुख्यमंत्रिपदाचे दावेदार सुवेंदू अधिकारी यांच्या PA ची गोळ्या झाडून हत्या, थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT