Actor-turned-politician Thalapathy Vijay takes oath as Tamil Nadu Chief Minister as actress Trisha Krishnan attends the grand ceremony. saam tv
देश विदेश

तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी थलपती विजय, विजयच्या शपथविधीला त्रिशाची जादू

Tamil Nadu Politics Gets a Star Touch as Vijay Begins CM Journey: थलपती विजय यांनी अखेर तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतलीये. मात्र, विजय यांची कारकीर्द सुरू झाल्यानं आता 'एमजीआर' पॅटर्नची जोरदार चर्चा सुरू झालीये. पाहूयात यावरचा एक स्पेशल रिपोर्ट...

Saam Tv

तमिळनाडूच्या राजकारणात आज एक नवं पर्व सुरू झालंय.. दोन दशक रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयानं आणि अ‍ॅक्शननं करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारे विजय थलपती आता तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेत. या शपथविधीच्या कार्यक्रमातलं मुख्य आकर्षण होतं ते म्हणजे, त्रिशा कृष्णन. विजय यांच्या शपथविधा सोहळ्यात सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं होतं ते त्रिशानं...त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा रंगली ती एमजीआर म्हणजे एम.जी. रामचंद्रन आणि जयललिता यांच्या मैत्रीची.. .

१. पडद्यावरील केमिस्ट्री

एमजीआर - जयललिता या जोडीने २८ चित्रपट एकत्र केले. त्यांच्या चित्रपटांतून एक सामाजिक संदेश दिला जायचा, जिथे एमजीआर 'गरिबांचा कैवारी' असायचे आणि जयललिता त्यांना साथ देणारी एक खंबीर नायिका.

'घिल्ली', 'थिरुपाची',आणि 'लिओ' सारख्या सुपरहिट चित्रपटांमुळे विजय-तृषा ही जोडी 'एव्हरग्रीन' मानली जाते.

२. 'मास हिरो' ते 'राजकीय नेता

एमजीआर यांनी चित्रपटांमधून सामाजिक संदेश दिला जायचा. विजय यांनीही गेल्या 10-15 वर्षांत आपल्या चित्रपटांतून भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवणारा नायक साकारून स्वतःची राजकीय पार्श्वभूमी तयार केली.

३. महिला समर्थकांची साथ

एमजीआर यांच्या यशात महिला मतदारांचा मोठा वाटा होता. जयललिता यांनी पुढे तोच मतदार वर्ग स्वतःकडे वळवला. तर विजय यांचा 'फॅन बेस' तरुणांमध्ये आणि महिलांमध्ये प्रचंड आहे. त्रिशाची लोकप्रियता तेवढीच आहे

सध्या त्रिशा राजकारणात सक्रिय नसल्या तरी विजय आणि तिची स्क्रीन आणि ऑफस्क्रिन मैत्री कायमच चर्चेत राहिली आहे. एमजीआर आणि जयललिता यांनी जसं सिनेमा आणि राजकारण हे समीकरण यशस्वी करून दाखवले तशीच विजय यांचीही वाटचाल सुरू आहे. त्यामुळे त्रिशा ही मुख्यमंत्री विजय यांच्या राजकीय प्रवासात जयललितांसारख्या भूमिकेत दिसणार का हे बघणं औत्सुक्याचं असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लातूरच्या उदगीर- बिदर रोडवर भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू

Moong Dal Chilla Recipe: सकाळी करा नाश्ता हेल्दी, झटपट बनवा टेस्टी मूग डाळ चिल्ला, वाचा रेसिपी

कृषी विभागाचा महाघोटाळा? कृषी कंपन्यांच्या नावावर अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार?

खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची पहिल्यांदाच SIT चौकशी, IPS सातपुतेंनी ६ तासांत काय-काय विचारलं?

Vasai: लग्न मंडपात तुंबळ हाणामारी, वऱ्हाडींनी एकमेकांना धूधू धुतलं; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT