Thailand Bangkok Shooting x
देश विदेश

Thailand Bangkok Shooting : भर बाजारात अंदाधुंद गोळीबार! ६ जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वतःवरही झाडली गोळी

Thailand Shooting : बँकाॅकमधील बाजारामध्ये एका व्यक्तीने अचानक अंदाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली. या गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाला. गोळीबारानंतर हल्लोखोराने स्वत:वर गोळी झाडून घेतली.

Yash Shirke

  • थायलंडची राजधानी बँकाॅकमध्ये गोळीबाराची घटना

  • भर बाजारात झालेल्या गोळीबारात सहा जणांचा मृत्यू

  • गोळीबार केल्यानंतर हल्लेखोराने स्वत:वर गोळी झाडून केली आत्महत्या

Bangkok Shooting : थायलंडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. थायलंडची राजधानी बँकॉकमधील एका बाजारात झालेल्या गोळीबारामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोराने बाजारामध्ये अंदाधुंद गोळीबार केला आणि त्यानंतर स्वत:वरही गोळी झाडून घेतली. गोळीबारामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांपैकी चौघे त्या बाजारपेठेतील सुरक्षा कर्मचारी होते, असे म्हटले जात आहे.

बँकॉकमधील लोकल फ्रेश फूड मार्केटमध्ये गोळीबार करण्यात आला. बांग सु जिल्ह्याच्या पोलीस दलाचे उपप्रमुख वोराफत सुकथाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सामूहिक गोळीबाराचा प्रकार आहे. या हल्ल्याचा थायलंड आणि कंबोडिया यांच्यामध्ये सुरु असलेल्या सीमावादाशी काही संबंध आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. हल्लेखोराने गोळीबार का केला यामागील कारण शोधण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे.

थायलंडमधील वाढता हिंसाचार

मागील काही वर्षांमध्ये थायलंडमध्ये हिंसाचाराच्या घटना वाढत आहे. मे २०२५ मध्ये यू थोंग जिल्ह्यातील बान डोनमध्ये एका ३३ वर्षीय व्यक्तीने अंदाधुद गोळीबार केला होता. या गोळीबारामध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला. ही घटना वाट यांग सावंग अरोम शाळेपासून ५० मीटर अंतरावर घडली होती. गोळीबारादरम्यान शाळेतील सर्व मुलांना बाहेर काढण्यात आले होते.

ऑक्टोबर २०२३ मध्ये बँकाॅकमधील सियाम पॅरागॉन मॉलमध्ये एका १४ वर्षीय मुलाने गोळीबार केला होता. या गोळीबारामध्ये दोघांचा मृत्यू झाला होता, तर अनेकजण गंभीर जखमी झाले होते. २०२२ मध्ये थायलंडच्या ईशान्या भागात एका बालसंगोपन केंद्रावर झालेल्या हल्ल्यात २४ लहान मुलांसह ३६ जणांचा मृत्यू झाला होता. आकडेवारीनुसार, थायलंडमध्ये मागील काही वर्षांमध्ये गुन्हेगारी वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : विसर्जन मिरवणुकीत पारंपारिक लेझीम नृत्यावर फिरकल्या भाजप नेत्या डॉ हीना गावित....

सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून वेद वदवतायत; राज ठाकरेंचा ज्ञानेश कुमारांवर घणाघात

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सोनं-चांदीच्या किंमती मोठा बदल, जाणून घ्या २४ , २२ आणि १८ कॅरेटचा भाव

Palak Tikki For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी घरीच बनवा पालक टिक्की, सोपी आहे रेसिपी

LPG Gas Cylinder : ग्राहकांसाठी मोठी बातमी! वर्षाला ६ सिलिंडर मिळणार मोफत; कुठे आणि कोणासाठी लागू केला आहे हा निर्णय? वाचा

SCROLL FOR NEXT