Sanjay Raut Saam Tv
देश विदेश

Sanjay Raut: नव्या संसदभवनाच्या गळतीवरून राजकारण तापलं; संजय राऊतांचा PM मोदी-शहांवर घणाघात

Sanjay Raut Criticized PM Modi And Amit Shah: नव्या संसदभवनाच्या इमारतीला गळती लागल्याचं समोर आलंय. यावरून आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अमित शहा आणि पंतप्रधान मोदींवर टीका केलीय.

Rohini Gudaghe

प्रमोद जगताप, साम टीव्ही नवी दिल्ली

नव्या संसदेचं नुकतंच काही महिन्यांपूर्वी मोठ्या थाटामाटात उद्घाटन झालं होतं. काही दिवस उलटत नाही, तेच आता या इमारतीला गळती लागल्याची माहिती मिळत आहे. कॉंग्रेस नेत्याने यासंदर्भातील एक व्हिडिओ देखील पोस्ट केलेला आहे. यावरून मात्र आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आक्रमक झाल्याचं दिसत आहे. राऊत यांनी इमारतीच्या कामावरून अमित शहा आणि पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केलाय.

संजय राऊत यांची टीका

सेंट्रल व्हिस्ता मोदी (PM Modi) आणि शाह यांच्या ठेकेदारांनी ही वास्तू बनवली आहे. ती खचत आहे, देशभरात त्यांच्या ठेकेदारांनी बनवलेल्या वस्तूंना अल्पकाळातच तडे जात असल्याची टीका संजय राऊत (Thackeray Group Leader Sanjay) यांनी केलीय. यात किती कमिशनबाजी झालीय, हे दिसत आहे असं म्हणत त्यांनी पीएम मोदी-शहांवर निशाणा साधलाय. राज्यात समृद्धी, अटल सेतू याही वास्तू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

पीएम मोदी-शहांवर निशाणा

अयोध्येच्या राम मंदिराला देखील गळती लागली आहे. ठेकेदारांच्या माध्यमातून निवडणुकीसाठी पैसे घ्यायचे, हा उद्योग असल्याचा टोला राऊत यांनी लगावला आहे. राष्ट्रीय अस्मिता कुठे शिल्लक आहे? असा संतप्त सवाल त्यांनी विचारला (Water Leakage in New Parliament) आहे. संसदेत अशी अवस्था असेल, तर सदस्य आणि जनतेने प्रश्न का विचारू नयेत हा साधा सवाल आहे. सभागृहात जाब विचारण्याचा अधिकार फक्त सत्ताधाऱ्यांना आहे, आम्ही प्रश्न विचारला गुन्हेगार होतो, असं देखील संजय राऊत म्हणाले आहेत.

भाजपवर हल्लाबोल

नव्या संसदभवनाला लागलेल्या गळतीवर राऊत म्हणाले की, ज्या ठेकेदारांनी याचं काम केलंय. त्यावर कारवाई करण्याची आम्ही नक्की मागणी करू. माणूस किती अनितिमान, भ्रष्ट, क्रूर असू शकतो, याचं उदाहरण फडणवीस आहेत. ते दळभद्री राजकारण करत असल्याची टीका संजय राऊत यांनी केलीय. अयोध्येचे राम मंदिर आणि संसद भवनाच्या गळतीवरून ठाकरे गटाने भाजपवर (BJP) हल्लाबोल केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT