Sexual Assault On Horse
Sexual Assault On Horse Saam TV
देश विदेश

Crime News: तबेल्यात घुसून घोड्यांवर लैंगिक अत्याचार; नराधमाला १० वर्षांची शिक्षा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टेक्सास, यूएसए : अमेरिकेतील टेस्कास शहरात एक किळसवाणी घटना घडली आहे. एका २४ वर्षीय तरुणाने चक्क घोड्यावरच (Horse) लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केल्यानं खळबळ माजली आहे. संतापजनक बाब म्हणजे एक त्याने किमान ३ वेळा घोड्यांवर लैंगिक अत्याचार केले. ही घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाल्यानंतर घोड्याच्या मालकाने पोलिसात तक्रार केली. गुन्ह्याच्या तपासाअंती न्यायलयाने गुन्हेगाराला १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. (Texas man who had sex with a horse is jailed for 10 years)

टेक्सासच्या जीन मेरी बुगोमा (Jean Marie Bugoma) या २४ वर्षीय तरुणाला त्याच्या पाशवीपणासाठी बुधवारी दोषी ठरवण्यात आले. अमेरिकेतील KSAT News या संस्थेने ही बातमी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जून 2020 आणि फेब्रुवारी 2021 दरम्यान किमान तीन वेळा सॅन अँटोनियो इक्वीन बोर्डिंग सुविधेत हा विकृत गुन्हा घडला. पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, पहिल्या घटनेत बुगोमा नग्न अवस्थेत तबल्यातून फिरताना सीसीटीव्हीत आढळला होता. तेव्हा मालकाच्या लक्षात आले की त्याचे दोन घोडे जखमी झाले आहेत. तेव्हा पशुवैद्यकाने घोड्यांची तपासणी केली आणि घोड्यांवर लैंगिक अत्याचार झाले असल्याचे आढळून आले.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेनंतर बुगोमा काही महिन्यांनंतर पुन्हा तबेल्यात गेला आणि एका घोड्याशी सेक्स केला. तर इतर दोन घोडे देखील "हॉबल्ड" (hobbled) होते, ज्याचा अर्थ त्यांचे पाय एकत्र बांधलेले होते. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये जेव्हा मालकाने बुगोमाला परत पकडले, तेव्हा अधिकाऱ्यांनी त्याच्याविरुद्ध वॉरंट मिळवले. यानंतर एका घोड्याचा डीएनए (DNA) हा संशयिताच्या घोड्याशी जुळतो हे कळल्यानंतर या विकृत गुन्ह्याचा उलगडा झाला. याप्रकरणी न्यायालयाने गुन्हेगाराला १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Santosh Juvekar Post : संतोष जुवेकरचा फोटो थेट हेअर सलूनच्या बोर्डावर, अभिनेत्याने सांगितला बालपणीचा 'तो' किस्सा

Dhananjay Munde News| राष्ट्रवादीने आबा पाटलांना मुख्यमंत्री का नाही केले? धनंजय मुंडे यांचा सवाल

Solapur Politics: शरद पवारांचे निकटवर्तीय देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, सोलापूरमध्ये नेमकं घडतंय तरी काय?

Pune Narendra Modi: नरेंद्र मोदी यांच्यासाठी खास पगडी साकारली! नेमकं वैशिष्ट्य काय?

MS Dhoni Record: एमएस धोनीने रचला इतिहास! IPL मध्ये असा रेकॉर्ड करणारा ठरला जगातील पहिलाच खेळाडू

SCROLL FOR NEXT