Robot Attack Saam Tv
देश विदेश

Tesla Robot Attack:टेस्लाच्या इंजिनीयरवर कंपनीत रोबोचा जीवघेणा हल्ला; दोन वर्षानंतर प्रकरण उघडकीस

Robot Attack: टेस्लाच्या गीगा टेक्सास कारखान्यात एका रोबोटने कारखान्यात काम करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात एक अंभियता (Engineer) गंभीर जखमी झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Tesla Texas Robot Attack:

टेस्लाच्या (Tesla) गीगा टेक्सास कारखान्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका रोबोटने कारखान्यात काम करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात एक अंभियता गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे रोबोटदेखील माणसांवर हल्ला आणि वर्चस्व करणार का अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. (Latest News)

मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार, टेस्लाच्या (Tesla) गीगा टेक्सास कारखान्यात १० नोव्हेंबर २०२१ रोजी हा अपघात झाला. या अपघाताचे कारण म्हणजे रोबोट . रोबोटने कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केला आहे. वाहनांचे चेसीस असेंबल करणाऱ्या एका अभियंत्यावर रोबोटने हल्ला केला आहे. या घटनेमुळे कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि ऑटोमेशनवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

रोबोटने केलेल्या हल्ल्यात अभियंत्याच्या (Engineer)हाताला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. रोबोटचा हात इंजिनियरच्या पाठीत आणि हातात घुसला त्यात तो जखमी झाला. त्याच्या हात आणि पाठीतून रक्तस्त्राव होत होता. एका कर्मचाऱ्याने लगेचच इमर्जन्सी स्टॉप बटण दाबले त्यामुळे त्याचा जीव वाचला.

याबाबत कंपनीच्या कर्माचाऱ्यांनी माहिती दिली आहे. हा अभियंता सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग करत होता. त्यावर काम करताना त्याने तिथे असलेल्या दोन रोबोट बंद केले होते. परंतु एक रोबोट चुकून बंद करायचा राहून गेला. त्यामुळे हा हल्ला झाला आहे.

या प्रकरणावर टेस्लाने अद्याप कोणतीही माहिती दिली नाहीये. परंतु यूएस हेल्थ अँड सेफ्टी अॅडमिनिस्ट्रेशनला सादर केलेल्या अहवालानुसार, टेस्लाच्या टेक्सास कारखान्यातील प्रत्येक 21 कर्मचाऱ्यांपैकी 1 कर्मचारी गेल्या वर्षभरात जखमी झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivli Crime: संतापजनक! मदतीसाठी बोलावलेल्या मित्राकडूनच अनाथ तरुणीवर अत्याचार

भोंदू मनोहर भोसलेला राजकीय आश्रय? भोसलेच्या वाढदिवसाला 90 आमदारांची हजेरी?

Pune Crime : पुण्यातील खेडमध्ये गुंडांच्या टोळीचा धुडगूस, नागरिकांवर हल्ला, एकाला कारच्या बोनेटवरून फरफटत नेले, VIDEO

भररस्त्यात आमदाराच्या कानफटात मारली; राजकारणात खळबळ

Maharashtra News Live Update: नालासोपाऱ्यात मराठी भाषेचे स्टिकर मनसे काडून रिक्षावर लावण्याची मोहीम सुरू

SCROLL FOR NEXT