Elon Musk's Flying Car Dream: Tesla Roadster Could Take Mobility to New Heights saam tv
देश विदेश

लवकरच टेस्लाची हवेत उडणारी कार, ताशी 97 किमी वेगानं उडणार कार

Elon Musk's Tesla Roadster: आजवर तुम्ही रस्त्यावर धावणारी कार पाहिलीये. मात्र, हवेत उडणारी कार पाहण्याचं स्वप्न प्रत्यक्षात येणार आहे. कारण, कारनिर्मितीत भूतो न भविष्यति असा बदल घडवून आणण्यात एका कंपनीला यश आलंय. कुठली आहे ही कंपनी?... कारनिर्मितीतला नवा आविष्कार काय आहे?... पाहूयात या रिपोर्टमधून...

Rohit Kadam

पाहिलंत... हा काही हॉलिवूडपटातील अॅक्शन सीन नाहीये.. ना कुठला गेमिंगचा व्हिडिओ... हा आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा अद्भुत आविष्कार... होय... तुम्ही बरोबर ऐकलंत... जगातील बलाढ्य कार निर्मिती करणाऱ्या एका कंपनीनं संपूर्ण जगाला थक्कं केलंय.

अब्जाधीश एलन मस्क यांच्या टेस्ला कंपनीनं अखेर बहुप्रतिक्षित 'रोडस्टर' ही हवेत उडणाऱ्या कारची यशस्वी चाचणी केलीय. त्यामुळे भविष्यातील जगात वाहतूक व्यवस्थेचं चित्र पूर्णपणे बदलून जाण्याची चिन्हे आहेत.हवेत उलटसुलट होत सुरक्षित लँडिंग करणाऱ्या टेस्लाच्या 'रोडस्टर' कारची वैशिष्ट्येही अचंबित करणारी आहेत...

टेस्लाची फ्लाईंग कार

रॉकेट तंत्रज्ञानावर आधारित नवीन रोडस्टर कार

अवघ्या 1 सेकंदात 97 किमी प्रतितास वेग पकडणार

स्पेसएक्सच्या रॉकेटसारखे कोल्ड-गैस थ्रस्टर्सचा कारमध्ये वापर

बहुप्रतिक्षित रोडस्टर कारचं प्रत्यक्ष उत्पादन 2028 मध्ये सुरू होणार

कार बुक करण्यासाठी मोजावे लागणार 48 लाख रुपये

टेस्लानं पहिली रोडस्टर कार 2008 मध्ये लाँच केली होती. तसंच, 2012 मध्ये कारचं उत्पादन बंद करण्यात आलं होतं. मात्र, आगामी काळात तुम्हाला फ्लाईंग कारचा अनुभव घ्यायचाय? तर तुमचं हे स्वप्न टेस्ला हे पूर्ण करणारेय. मात्र, त्यासाठी तुम्हाला लाखो रुपयेदेखील खर्च करावे लागणार आहेत. ही हवेत उडणारी कार सर्वप्रथम अमेरिकन बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. भारतातही या कारबाबत लोकांच्या मनात उत्सुकता निर्माण झालीये. एव्हंढच नव्हे तर भारतात हवेत उडणारी कार आल्यास रस्त्यांवरील विजेच्या तारांमध्ये अडकण्यावरून सोशल मीडियावर चर्चा रंगलीये. विशेष म्हणजे, मस्क यांच्या टेस्लानं पहिल्या इलेक्ट्रिकसह चालकविरहित कार लाँच केली होती. आता आणखी एक पाऊल पुढे टाकत मस्क हे पुन्हा एकदा ऑटोमोबाईल क्षेत्रात क्रांती घडवण्याच्या मार्गावर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: लाडकींना केंद्राकडून महिन्याला 5 हजार? केंद्र सरकारची गाव की बेटी योजना?

BMC कार्यालयाच्या वॉशरूममध्ये दारूच्या बाटल्या; महापालिका कार्यालयात नेमकं चाललंय काय?

कोल्हापूरच्या ड्रग्सचे कनेक्शन थेट चीन, हाँगकाँगपर्यंत; महाराष्ट्रात ९ महिन्यात ६१९ कोटींचं अमली पदार्थ जप्त

Maharashtra News Live Update: मुंबईकडून कर्जतकडे जाणाऱ्या फास्ट लोकल धीम्या गतीने

पुणे विधान परिषद निवडणुकीत ट्विस्ट! शिंदे गटाकडून सचिन सानप यांना उमेदवारी शिवसेनेचा भाजपला 'दे धक्का'

SCROLL FOR NEXT