उन्हाळी सुट्ट्या लागल्या आणि मोठ्या संख्येनं लोकं हे पर्यटनासाठी बाहेर पडू लागले. ज्यापर्यटकांना स्विजर्लंड, लंडन, बँकाकला जाता येत नाही तसे अनेक पर्यटक देशाच्या नंदनवनला भेट देतात. दहशतवादानं ग्रासलेल्या काश्मिरमध्ये आजवर कधीच पर्यंटकांवर हल्ला झाला नव्हता. मात्र दहशतवाद्यांनी मंगळवारी क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडत धर्म विचारून देशाच्या विविध राज्यातून आलेल्या पर्यटकांना वेचून वेचून गोळ्या मारल्या आणि इथेच देश स्तब्ध झाला.
देशातील अनेकांची पहिली पसंती कायम काश्मिरला मिळत आली. आणि त्याचमुळे काश्मिरच्या महसूली उत्त्पनात पर्यटनामुळे कायम मोठी भर पडली आणि लाखो हातांना याच पर्यटनामुळे रोजगार मिळाला मात्र मंगळवारच्या हल्ल्यानं काश्मिरींच्या ताटातील घास आणि हातातील रोजगार हिरावून घेण्याचं काम केलंय.
काल झालेल्या या हल्ल्यानं काश्मिरी धास्तावले कारण आता पोटापाण्याचा यक्ष प्रश्न उभा राहणार आहे. ऐन पर्यटनाच्या मोसमातच हा हल्ला झाला आणि सगळे पर्यटक माघारी परतले तर अनेकांनी आपलं बुकींग रद्द केलं. काश्मिरचे रस्ते, हाऊस बोट, फुलांची पठारं, हॉटल्याच्या रुम सगळं काही क्षणात ओस पडलं. पर्यटन काश्मिरसाठी कसं महत्वाचं आहे समजून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून.
काश्मिरची लोकसंख्या 1 कोटी 25 लाखांच्या आसपास
फक्त 2024 मध्ये 2 कोटी 30 पर्यटकांची काश्मिरला भेट
कश्मीरचं महसूली उत्पन्न अंदाजे 80,000-85,000 कोटी रुपये
केंद्राकडून मिळणारं अनुदान अंदाजे 59,943 कोटी
उर्वरीत महसूल हा पर्यटन आणि कराद्वारे
अंदाजे 12 ते 15 हजार कोटींचा पर्यटनाद्वारे मिळणारा महसूल
वैष्णो देवी आणि अमरनाथ यात्रेमुळे पर्यटकांची वर्षभर काश्मिरात रेलचेल असते. आता या हल्ल्यानंतर काश्मीर पर्यटकांची पहिली पसंती राहिल का...या हल्ल्याने काश्मिरमधील तरुणांच्या हातातला रोजगार जाऊन पुन्हा हातात दगड तर येणार नाही ना.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.