Jammu-Kashmir Encounter Saam TV
देश विदेश

Terrorist Attack: कठुआमध्ये लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; चकमक सुरू

Jammu-Kashmir Encounter: जम्मूच्या कठुआमध्ये लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झालाय. एका टेकडीवर लपवून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांच्या वाहनावर हल्ला केला असून चकमक अजून सुरूय.

Bharat Jadhav

जम्मूच्या कठुआमध्ये लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाल्याची घटना घडलीय. मछेडी परिसरात दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर ग्रेनेड फेकला त्यानंतर गोळीबार केला. या हल्ल्यात दोन जवान जखमी झालेत. या हल्ल्यानंतर लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झालीय. दहशतवाद्यांच्या शोधासाठी सुरक्षा दलाचे पथकेही रवाना झाली आहेत.

लष्कराचे वाहन जात असताना टेकडीवर लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी वाहनावर ग्रेनेड फेकले आणि गोळीबार सुरू केला. यानंतर सुरक्षा दलानेही चोख प्रत्युत्तर दिले. यात दोन जवान जखमी झालेत. दरम्यान मागील काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात अशांतता वाढलीय. दहशतवादी हल्ले आणि चकमकीच्या बातम्या सातत्याने येतायेत. रविवारीही राजौरी येथील भारतीय लष्कराच्या तळावर दहशतवादी हल्ला झाला होता. रात्रीच्या अंधारात लष्कराच्या छावणीवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. या घटनेत जवान जखमी झाला होता.

घराच्या कपाटात दहशतवाद्यांचा बंकर

जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ६ आणि ७ जुलै रोजी मुद्राघम आणि चिन्निगाम फ्रिसालमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला होता. चकमकीनंतर लष्कराच्या शोधाचा एक व्हिडिओ समोर आलाय. व्हिडिओमध्ये एका घरात लाकडी कपाट दिसत आहे. कपाटाच्या मागे काही ड्रॉवर्स असून जे काढल्यावर एक अरुंद रस्ता दिसून येत आहे. हा रस्ता बंकरकडे जातो. चिनीगाम फ्रिसल भागात ठार झालेल्या ६ पैकी ४ दहशतवादी या बंकरमध्ये लपून बसले होते, असा दावा सुरक्षा दलाकडून करण्यात येत आहे.

दरम्यान कुलगाममध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी ६ दहशतवाद्यांचा खात्मा केलाय. तर दोन जवानही शहीद झाले होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मारले गेलेले दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंधित होते. त्यातील एकजण पाकिस्तानशी संबंधित दहशतवादी संघटनेचा स्थानिक कमांडर होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT