Jammu-kashmir: उरीमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार

Jammu Kashmir Encounter : काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरीमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. मात्र, बीएसएफच्या जवानांनी ही घुसखोरी हाणून पाडलीय. सुरक्षा दलाच्या पथकाने एलओसीजवळ दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला असून अजूनही गोळीबार सुरू आहे.
Jammu-kashmir: उरीमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार
Jammu Kashmir Encounter Mid Day

काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरीमध्ये दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. बीएसएफच्या जवानांनी ही घुसखोरी हाणून पाडली असून सुरक्षा दलाच्या पथकाने एलओसीजवळ दोन दहशतवाद्यांचा खात्मा केलाय. दरम्यान सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये अजूनही चकमक सुरू आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, गोहलन भागातून दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत होते त्यावेळी सुरक्षा दलाने त्यांना कंठस्नान घातले.

बुधवारी भारतीय लष्कराच्या संयुक्त पथकाने उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला येथे दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. याशिवाय हल्ल्यात सहभागी असलेल्या एका आरोपीलाही अटक करण्यात आलीय. रियासी हल्ला प्रकरणातील ही पहिली अटक होती. या चकमकीत सामील असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, हदीपोरा भागात ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांची ओळख पटलेली नाहीये.

रियासी हल्ल्याप्रकरणी जम्मू-काश्मीर पोलिसांनी हकमुद्दीन नावाच्या व्यक्तीला अटक केली होती. हकमुद्दीनने ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांना आपल्या घरात आश्रय दिला होता. हकमुद्दीनने दहशतवाद्यांना बसवर हल्ला केलेल्या ठिकाणी नेलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com