Pahalgam Terror Attack X
देश विदेश

Pahalgam Terror Attack: कलमा वाचायला लावला अन् पॅन्ट काढून 'खतना' तपासला; हिंदू पुरूषांच्या छातीवर गोळ्या झाडून हत्या

Terror Strikes Pahalgam: जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन व्हॅलीत झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी २५ हिंदू पुरुष होते. खतना तपासण्यासाठी मृतांपैकी २० जणांचे पॅन्ट काढल्याची माहिती समोर आली आहे.

Bhagyashree Kamble

जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन व्हॅलीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला, ज्यात २५ हिंदू पुरुषांचा समावेश आहे. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली. दरम्यान, जम्मू काश्मीर पोलीस आणि प्रशासनाच्या संयुक्त तपास पथकाने केलेल्या तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांनी पीडितांचे धर्म ओळखण्यासाठी पुरूषांचे पॅन्ट काढून खतना तपासले होते. मृतांपैकी २० जणांचे पॅन्ट काढल्याची माहिती आहे.

खतना पाहुन पुरूषांची हत्या

टाईम्स ऑफ इंडियाने त्यांच्या वृत्तात सुत्रांचा हवाला देत म्हटलं की, दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी त्यांचे धर्म विचारले. नंतर त्यांlच्यावर धडाधड गोळ्या झाडल्या. ओळख पटवण्यासाठी दहशतवाद्यांनी पर्यटकांकडे आधार कार्ड किंवा ओळखपत्र मागितले. नंतर त्यांना कलमा वाचण्यास भाग पाडले आणि पॅन्ट काढून त्यांचा खतना तपासला.

दहशतवाद्यांनी खतना तपासून पुरूषांवर हल्ला चढवल्याची माहिती समोर आली आहे. पर्यटक हिंदू आहेत की नाही ते आधी तपासले नंतर काहींच्या छातीवर तर काहींच्या डोक्यात गोळ्या झाडल्या. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर कुटुंबाना प्रचंड धक्का बसला. त्यामुळे मृत व्यक्तींच्या कपड्यांकडे त्यांचे लक्ष गेले नसावे.

२५ मृतांपैकी २५ जण हिंदू पुरूष होते

दहशतवादी हल्ल्यात २६ लोकांचा बळी गेला. त्यापैकी २५ जण हिंदू पुरूष असल्याची माहिती समोर आली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास आता वेगाने सुरू आहे. तसेच संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या हल्ल्यानंतर भारत सरकारनेही पाकिस्तानविरूद्ध कडक पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखचं सांगितली

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT