Brazil google
देश विदेश

Brazil Accident: ब्राझीलमध्ये भीषण अपघात, बस आणि ट्रकची जोरदार धडक, ३८ जणांचा होरपळून मृत्यू

Brazil Road Accident: ब्राझीलच्या मिनास गेराइस राज्यातील महामार्गावर शनिवारी पहाटे प्रवासी बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत ३८ जण ठार झाले.

Dhanshri Shintre

दक्षिण-पूर्व ब्राझीलच्या मिनास गेराइसमध्ये शनिवारी एक भीषण रस्ता अपघात झाला. ज्यामध्ये ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. BR-116 महामार्गावरील तेओफिलो ओटोनीजवळ बस आणि ट्रकची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून 13 प्रवाशांची सुटका केली आणि त्यांना तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल केले.

बसमधील इतर प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेत बस चालकाचाही मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे. साओ पाउलोहून बाहियाला ४५ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचा टायर फुटल्याने बसचे नियंत्रण सुटून ट्रकला धडकली, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

घटनास्थळावरील फोटोमध्ये चिरडलेल्या कारवर एक ट्रक असलेला दिसत असून, त्याचे चाक कारच्या छतावर असल्याचे दिसून येते. घटनास्थळावरून ट्रकचालक फरार झाला असून, ट्रकमधून पडलेल्या ग्रॅनाइटच्या तुकड्यामुळे अपघात घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अग्निशमन दलाने १३ प्रवाशांची सुटका करून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. अपघाताचे नेमके कारण फॉरेन्सिक तपासणीनंतरच स्पष्ट होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

२०२१ मध्ये ब्राझीलमधील रस्त्यावरील अपघातातील मृत्यू दर प्रति १००,००० लोकांमागे १५.७ होता, जो अर्जेंटिनामधील ८.८ पेक्षा खूपच जास्त होता. रस्ता सुरक्षेबाबत, ब्राझीलने २०३० पर्यंत मृत्यूची संख्या निम्म्या करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, यामुळे ८६,००० जीव वाचतील अशी अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कामाला जायची घाई नडली, तरुणी जीवाला मुकली; काळीज पिळवटून टाकणारा CCTV व्हिडिओ

Maharashtra Live News Update: कारची दुचाकीला धडक, मोटारसायकल स्वारला लांबपर्यंत नेलं फरफटत, दिवेआगरमधील घटना

Night Good Habits: रात्री झोपण्यापूर्वी फक्त 5 गोष्टी करा, सकाळी उठल्यावर मूड होईल फ्रेश

मोठी बातमी! मिरा-भाईंदरमध्ये भाजपने बसवला गुजराती महापौर

Truck Accident: भीषण अपघात; शंभरच्या स्पीडनं धावणाऱ्या ट्रकच्या धडकेत २ रिक्षांचा चक्काचूर, ५ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT