Terrible Accident: भयंकर! आंध्र प्रदेशमध्ये भीषण अपघात, 9 जणांचा मृत्यू Saam Tv
देश विदेश

Terrible Accident: भयंकर! आंध्र प्रदेशमध्ये भीषण अपघात, 9 जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेशमध्ये काल एक भीषण अपघात झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था: आंध्र प्रदेशमध्ये काल एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला आहे. लग्नाहून (marriage) परतणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. भरधाव वेगात आलेली लॉरी (Lorry) ने कारला जोरात धडक दिल्याने कारमधील (car) लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) अनंतपुरम-बेल्लारी (Ballari) राष्ट्रीय महामार्गावर कोटलापल्ली (Kotlapalli) गावाजवळ (village)हा अपघात घडला आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. (Terrible accident in Andhra Pradesh 9 killed)

हे देखील पहा-

पोलिसांनी (police) दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेले सर्व लोक हे उरवाकोंडा (Urvakonda) येथील रहिवासी असून कर्नाटक (Karnataka) राज्यातील बेल्लारी येथे लग्नाकरिता गेले होते. लग्नाहून आपल्या गावी परत येत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला आहे. याप्रकरणी पोलिसामध्ये अपघाताची (accident) नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास उरवाकोंडा पोलीस करत आहेत. अपघातातील मृतांची अद्याप ओळख पटली नाही. पोलीस मृतांची ओळख पटविण्याचे काम करत आहेत.

कर्नाटक मधील बेल्लारी येथे एका लग्न समारंभात सहभागी होण्याकरिता उरवाकोंडा येथील एक कुटुंब आपल्या इनोव्हा कारने गेले होते. लग्नाहून परत येत असताना अनंतपुरम- बेल्लारी राष्ट्रीय महामार्गावर कोटलापल्ली भागात समोरुन भरधाव वेगात येणाऱ्या लॉरीने त्यांच्या कारला भीषण टक्कर दिली आहे. अपघात इतका भीषण होता, की यामध्ये कारमधील ९ जण जागीच ठार झाले तर एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. (Terrible accident in Andhra Pradesh 9 killed)

मात्र, उपचारादरम्यान आता मृत्यू झाला आहे. गाडीचा संपूर्ण चेंदामेंदा झाली आहे. या घटनेमुळे उरवाकोंडा गावावर शोककळा पसरली आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. अपघाताची माहिती स्थानिकांनी पोलिसांना देण्यात आली आहे. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आले आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: मेहेकर तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

Apple Milkshake Recipe : व्यायाम करून आल्यावर प्या 'ॲपल मिल्कशेक', दिवसभर रहाल उत्साही

Achyut Potdar Death : सिनेसृष्टीवर शोककळा, 3 Idiots मधील प्रोफेसर काळाच्या पडद्याआड

Hingoli Heavy Rain Flood : पावसाचा जोर वाढला, हिंगोलीत महापुरामुळे दोघांचा मृत्यू, मृतांच्या गावावर शोककळा

Mumbai : शाळेतून परत येताना बेस्टने उडवले, माय-लेकाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT