Jodhpur Violence Saam Tv
देश विदेश

जोधपूरमध्ये झेंडा लावण्यावरून तणाव; दोन गटांमध्ये दगडफेक

राजस्थानमधील मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या जिल्ह्यातील जोधपूरमध्ये रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात गदारोळ होताना दिसून आले आहे.

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था: राजस्थानमधील मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या जिल्ह्यातील जोधपूरमध्ये (Jodhpur) रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात गदारोळ होताना दिसून आले आहे. ईद आणि अक्षय्य तृतीयेच्या अगोदरच जातीयवाद बिघडवण्याचा प्रयत्न झाला आहे. रात्री उशिरा दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी (Fighting) आणि दगडफेक झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिस (Police) पथकावरही दगडफेक करण्यात आले आहे. यामध्ये काही पोलिस जखमी झाले आहे. त्यानंतर परिस्थिती अशी निर्माण झाली की, जिल्हा प्रशासनाने (District Administration) खबरदारीचा उपाय म्हणून रात्रीपासून परिसरातील सर्व इंटरनेट सेवा बंद केल्या आहेत.

हे देखील पाहा-

त्याचवेळी सकाळी ईदची नमाज अदा केल्यानंतर पुन्हा एकदा परिस्थिती बिघडू लागली आहे. पोलिसांनी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, जोधपूरच्या जलौरी गेटवर दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीमुळे तणाव निर्माण होणे दुर्दैवी असल्याचे स्वत: मुख्यमंत्री (CM) गेहलोत यांनी ट्विट (Tweet) केले आहे. कोणत्याही परिस्थितीत शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. त्यांनी सर्वाना शांतता राखण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

जिल्ह्यात परिस्थिती कशी बिघडली

स्वातंत्र्यसैनिकांच्या पुतळ्याजवळील झेंडा हटवण्यावरून वाद सुरू झाला. जालोरी गेट चौकातील बालमुकंद बिसाच्या पुतळ्या जवळील झेंडा काढून त्या जागी विशिष्ट समाजाचा झेंडा फडकावल्याने गोंधळ वाढला आहे. ज्यामध्ये दोन्ही बाजूचे लोक समोरासमोर आले आणि हाणामारी सुरू झाली. यानंतर मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गोंधळ आणि दगडफेकीची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मध्यस्थी करत जमावाला पांगवण्यास सुरुवात केली. मात्र, यादरम्यान पुन्हा जमाव जमल्याने परिस्थिती अनियंत्रित झाली.

दगडफेकीनंतर इंटरनेट सेवा ठप्प

दगडफेक आणि गोंधळामुळे पोलिसांच्या पथकाने पुन्हा परिस्थिती हाताळली आणि लाठीचार्जही करण्यात आला. तसेच अश्रुधुराच्या नळकांड्या सोडण्यात आल्या. मात्र, जोधपूरमध्ये जमावाला पांगवण्यात आलेल्या पोलिसांवरही एका समुदायाने दगडफेक केली आहे. यामध्ये अनेक पोलीस जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उदयमंदिरचे एसएचओ अमित सिहाग आणि डीसीपी पूर्व भुवन भूषण यादव यांच्यासह २ पोलीस जखमी झाले आहेत. मात्र, पोलिसांनी काही वेळातच परिस्थिती हाताळली.

सध्या संपूर्ण शहरातील वातावरण तणावपूर्ण असले तरी सकाळपासूनच शांतता आहे. हा सण जातीय सलोख्याने साजरा करण्याचे आवाहन पोलिस व प्रशासनाने केले आहे. त्याचवेळी जिल्हा प्रशासनाने तणावाचे वातावरण पाहता खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. जोधपूरमध्ये दुपारी १ वाजल्यापासून सर्व इंटरनेट सेवा बंद करण्यात येणार आहेत. जोधपूरचे विभागीय आयुक्त हिमांशू गुप्ता यांनी जारी केलेल्या आदेशात संपूर्ण जोधपूर जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'एक है तो अदानी सेफ है'; राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT