South China Sea Saam Digital
देश विदेश

South China Sea : दक्षिण चीन समुद्रात फिलिपाईन्सच्या जहाजांना चीनने रोखलं, दोन्ही देशांचे सैनिक भिडले

Second Thomas Shoal : दक्षिण चीन समुद्रात पुन्हा एकदा चीन आणि फिलिपाईन्समध्ये तणाव निर्माण झाला आहे. चीनच्या तटरक्षक दलाने फिलिपाईन्सच्या जहाजांना रोखलं, दोन्ही देशांचे जवान एकमेकांना भिडल्याची माहिती आहे.

Sandeep Gawade

South China Sea

दक्षिण चीन समुद्रात पुन्हा एकदा चीन आणि फिलिपाईन्समध्ये तणाव निर्माण झाला आहे. चीनच्या तटरक्षक दलाने फिलिपाईन्सच्या जहाजांना रोखलं, दोन्ही देशांचे जवान एकमेकांना भिडल्याची माहिती आहे, त्यामुळे पुन्हा परिस्थिती बिघडण्याची शक्यता आहे. दक्षिण चीन समुद्रातील काही भागांवर चीन दावा करतो. त्यामुळे या भागात नेहमीच तणावाची स्थिती असते.

फिलिपाइन्स कोस्ट गार्डचे प्रवक्ते कमोडोर जे टेरिएला यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनी जहाजांनी फिलिपाइन्सच्या दोन जहाजांवर धोकादायक कारवाया केल्या होत्या, यादरम्यान फिलिपाइन्स आणि चीनच्या जहाजामध्ये जोरदार धडक बसली. या धडकेत फिलिपाइन्सच्या जहाजाचं मोठं नुकसान झालं आहे, अशी माहिती फिलिपाइन्स कोस्ट गार्डचे प्रवक्ते कमोडोर जे टेरिएला यांनी दिली आहे. मात्र, ही घटना कोण्यात्या ठिकाणी झाली याबाबत सध्यातरी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. याआधी लष्कराने फिलीपिन्सच्या नियंत्रणाखालील दुसऱ्या थॉमस शोलमध्ये सामान आणि लष्करी कर्मचारी पाठवण्याबाबत वक्तव्य केलं होतं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांनी आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. दक्षिण चीन समुद्रातील चीनने आमच्या ज्या भूभागावर दावा केला आहे, त्या भूभागाच रक्षण करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता. यापुढेही सडेतोड उत्तर देण्यात येईल, असा इशारा चीनला दिला आहे. आगामी शिखर परिषदेत दक्षिण चीन समुद्रातील प्रादेशिक वादावर चर्चा होण्याची शक्यता आहे. दक्षिणपूर्व आशियाई राष्ट्र संघटना (ASEAN) आणि त्यांचे ऑस्ट्रेलियन समकक्ष यांच्यात या आठवड्यात शिखर परिषद होणार आहे. अशा परिस्थितीत दक्षिण चिनी समुद्रातील प्रादेशिक वादाचा मुद्दा परिषदेच्या अजेंड्यावर असणार आहे.

काय आहे वाद?

दक्षिण चीन समुद्रात फिलिपिन्सच्या पलावान प्रांतापासून २०० नॉटिकल अंतरावर दुसरे थॉमस शोल आहे. या प्रदेशावर नाकेबंदी करण्याचा प्रयत्न चीनने वारंवार केला आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये नेहमीच संघर्ष होत असतो. या वादग्रस्त भागावर अनेक देशांनी दावा केला असला तरी सध्या फिलिपिन्सच्या नौदलाच्या कर्मचाऱ्यांनी त्यावर कब्जा केला आहे. समुद्रातील या खडकाळ प्रदेशापासून केवळ २५ मैलांवर चीनच्या तटरक्षक दलाने त्यांच्या बोटी तैनात केल्या असून तिथे त्यांची नेहमीच गस्त सुरू असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sindhudurg Tourism : ना गर्दी, ना गोंधळ; शांत निसर्गरम्य वातावरणात घ्या 'या' धबधब्याचा आनंद

PF Maturity Calculator : १०, १५, २० वर्षे नोकरी केल्यावर खात्यात पीएफ किती जमा होईल? वाचा

Maharashtra Live News Update: पांडुरंगांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत फडणवीसांना कानात सांगावा - बच्चू कडू

kids Health Care: पावसात मुलांच्या तब्येतीसाठी आयुर्वेदिक पेय, आई-बाबांनी नक्कीच द्यावं

HBD Ranveer Singh: एकाच वेळी तीन मुलींना डेट...; दिपिका आधी कोणासोबत रिलेशनशिपमध्ये होता रणवीर सिंग?

SCROLL FOR NEXT