Telangana Traffic Police CPR Viral Video
Telangana Traffic Police CPR Viral Video Saam TV
देश विदेश

Viral News : बसमधून उतरताच आला हृदयविकाराचा झटका; वाहतूक पोलिसाने असा वाचवला जीव, थरकाप उडवणारा VIDEO

Satish Daud-Patil

Telangana Traffic Police CPR Viral Video : मृत्यू कुठे कधी कुणाला कसा गाठेल सांगू शकत नाही. चालता-बोलता, नाचता-गाता, हसतानाही अनेकांचा मृत्यू झाल्याची प्रकरणे तुम्ही आजवर बघितली असतील. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात जे पाहून काळजाचा ठोका चुकतो, असाच काहीसा प्रकार तेलंगणातून समोर आला आहे. इथे एका व्यक्तीला बसमधून उतरताच हृदयविकाराचा झटका आला.  (Latest Marathi News)

त्यानंतर तो थेट जमिनीवर कोसळला. सुदैवाने त्याठिकाणी कर्तव्यास असलेल्या एका ट्रॅफिक पोलिसाने या व्यक्तीकडे धाव घेतली. पोलिसाने तातडीने या व्यक्तीला रस्त्यावरच CPR देऊन त्याचे प्राण वाचवले. हृदयविकाराचा झटका आल्याने ही व्यक्ती रस्त्यावर पडली होती. त्याचा श्वास परत येईपर्यंत वाहतूक पोलिसांनी त्याच्या हृदयावर दबाव टाकला. या घटनेचा  व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तेलंगणा पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, बालाजी असं या व्यक्तीचे नाव आहे. तो राजेंद्रनगर येथे बसमधून खाली उतरला होता. खाली उतरताच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो रस्त्यावर कोसळला. त्याचवेळी तेथे कर्तव्यास असलेले ट्रॅफिक पोलिस राजशेखर यांनी बालाजीकडे धाव घेतले.

बालाजी हा रस्त्यावर पडलेला असताना, त्याच्या तोंडातून फेस येत होता. तसेच त्याला श्वास घ्यायला सुद्धा त्रास जाणवत होता. राजशेखर यांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी तातडीने बालाजीच्या शर्टाचे बटण काढले आणि क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी त्याला सीपीआर देण्यास सुरुवात केली.

सुमारे 2 मिनिटे ते त्याला सीपीआर देत राहिले. काही वेळानंतर बालाजीला शुद्ध आली. त्यानंतर राजशेखर यांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. बालाजीच्या तब्येतीत सुधारणा होताना दिसू लागली आहे. तो शुद्धीवर आला असून आता बोलू लागला आहे.

दरम्यान, ट्रॅफिक पोलिस राजशेखर हे बालाजीसाठी देवदूत म्हणून धावत आल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सध्या या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तेलंगना पोलिसांनी सुद्धा हा व्हिडीओ त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी या पोलिसांचं कौतुक करीत आहेत.

Edited By - Satish Daud Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Election |अबब! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात 9 हजार कोटींचा मुद्देमाल जप्त!

Sambhajinagar News: प्रेमविवाह करणाऱ्या मुलीची ‎कोयत्याने हत्या; शीर हातात घेऊन सेल्फी, मायलेकांना जन्मठेप

Special Report : नवी मुंबईत बनावट नोटांचा छापखाना

Pune News | पुण्यातील चाकण परिसरात गॅस टँकरचा स्फोट

Gold Silver Rate Hike : सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ; वाचा महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील आजचा भाव

SCROLL FOR NEXT