Khed Unique Marraige
Khed Unique MarraigeSaam Tv

Unique Marraige : आधी करार मग लग्न! आंबेगावमध्ये ६ अटींवर पार पडला आगळावेगळा लग्न सोहळा (Video)

Khed Unique Marraige : जशी प्रत्येक लव्हस्टोरी वेगळी असते, तशी प्रत्येक लग्नाची स्टोरीही वेगळीच असते... मग ते लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज असो...

Khed Unique Marriage News : जशी प्रत्येक लव्हस्टोरी वेगळी असते, तशी प्रत्येक लग्नाची स्टोरीही वेगळीच असते... मग ते लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज असो... आता अशीच काहीशी घटना पुण्यातील आंबेगावमध्ये घडली आहे. नवरीने आणि नवरदेवाने एकमेकांसमोर सहा अटी ठेवल्या आणि अटी ऐकूणच सगळे वऱ्हाडी आश्चर्यचकीत झाले.

आजकाल लग्नापुर्वी नवरा- नवरी यांच्यामध्ये काही बाबतीत करार होण्याचं प्रमाण बरंच वाढलं आहे. छोट्या शहरात हा बदल अजून दिसत नसला, तरी बऱ्याच ठिकाणी आता हा बदल स्वीकारला जात आहे.

Khed Unique Marraige
Bhandara News : आंघोळीला नदीकाठी गेला अन् परतलाच नाही; दहावीच्या विद्यार्थ्याचा नदीत बुडून मृत्यू

लग्न म्हंटल की नवरदेव आणि नवरी यांचे एक नव आयुष्य सुरु होतं. यामध्ये मुलगा मुलगी दोघे नव्या आयुष्याच्या सुखी संसाराची स्वप्न पहातात. मात्र ही स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी एकमेकांना समजून घेणं तितकंच महत्वाचं असतं.

असं एकमेकांना समजून घेत आंबेगाव (Ambegaon) तालुक्यातील गावडेवाडी येथील मुलगा कृष्णा लंबे आणि जुन्नरच्या नारायणगावची मुलगी सायली ताजणे यांचा विवाह सोहळा मंचर येथील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयात संपन्न झाला.

मात्र, या विवाह सोहळ्यात अगळावेगळा लग्नाचा (Marriage) करारनामा करण्यात आला. यावेळी नवरा मुलगा मुलगी आणि साक्षीदार म्हणून मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांनी स्वाक्षरी केलीय. लग्नाच्या बंधनात अडकत असताना नवविवाहित दामप्त्यांना एकमेकांकडुन असणाऱ्या आपेक्षा या लग्नच्या करारनाम्यामध्ये घेण्यात आल्या आहेत.

Khed Unique Marraige
Ulhasnagar Crime : मोठ्या भावाला पत्नीसोबत नको त्या अवस्थेत बघितलं; लहान भावाचं कृत्य पाहून पोलिसही चक्रावले

काय आहे हा "लग्नाचा करारनामा"

1) कृष्णा : सायलीचे म्हणणे नेहमी बरोबरचं असेल...!

2) सायली : मी कृष्णाकडे शॉपींगसाठी हट्ट धरणार नाही...!

3) सायली : मी कृष्णाला मित्रांबरोबर फिरायला, पार्टीलाजायला आडवणार नाही. (महिन्यातून दोन वेळा)

4) कृष्णा : मी सायलीची आणि आई वडिलांची ही सेवा करेल...!

5) सायली : मी कृष्णाचे मित्र घरी आल्यानंतर त्यांच्यासाठी स्वतःच्या हाताने जेवण बनवेल...!

6) आमच्यात वादविवाद झाले तरी ते आमचे आम्ही एक दिवसात मिटवू.

अशा सहा अटींवर हा लग्न सोहळा पार पडला.

लग्नानंतर मुलगा मुलगी आणि आई वडील आणि कुटुंबातील इतर नातेवाईक यांच्यात होणाऱ्या वादाच्या घटना रोजच पहायला मिळतात. या सर्व गोष्टी टाकल्या जाव्यात आणि लग्नापासून सुरु झालेले आयुष्य सुखाचे आणि खेळीमेळीच्या वातावरणात जावं अशीच भावना या निमित्ताने व्यक्त होत आहे. या लग्नाच्या करारनाम्याची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरु आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com