२ पुरूषांची प्रेमकहाणी!
शरीरसंबंध ठेवले नंतर मित्राचे तुकडे केले.
तेलंगणात खळबळ.
तेलंगणातील खम्मम जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. समलैंगिक संबंधातून एका पुरूषाने आपल्या मित्राची हत्या केली आहे. इंटरनेटवर व्हिडिओ बघून त्यानं मित्राची निर्घृण हत्या केली. तसेच मृतदेहाचे तुकडे करून विविध ठिकाणी फेकून दिले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तपास करून तिघांना अटक केली. सध्या पोलिसांकडून या भयानक प्रकरणाचा तपास सुरू आहे.
अशोक असे आरोपीचे नाव असून, त्यानं व्यंकटेश्वर या समलैंगिक मित्राची निर्घृण हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक मूळचा आंध्र प्रदेशातील एनटीआर जिल्ह्यातील रहिवासी. परंतु काही काळापासून तो खम्मममध्ये राहत होता. याच ठिकाणी त्याची भेट व्यंकटेश्वरशी (वय वर्ष ४०) झाली. व्यंकटेश्वर हा कप्तान बंजारा गावातील रहिवासी होता. तो एका खासगी कंपनीत काम करीत होता.
दोघांची ओळख झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. नंतरे हे नातं समलैंगिक संबंधात रुपांतरित झाले. व्यंकटेश्वर हा अशोकपेक्षा वयाने मोठा होता. तो अनेकदा अशोकला आर्थिक मदत करीत होता. कालांतराने दोघांमध्ये कडाक्याची भांडणे झाली. १५ सप्टेंबर रोजी व्यंकटेश्वर अशोकच्या घरी आला. तेव्हाही दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला.
रागाच्या भरात अशोकने त्याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. यामुळे व्यंकटेश्वरचा जागीच मृत्यू झाला. आता अशोकसमोर सर्वात मोठा प्रश्न होता की मृतदेहाचे करायचे काय? त्यानं इंटरनेटवर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची? हे सर्च केलं. त्यानं व्हिडिओ पाहून मृतदेहाचे तुकडे केले. तसेच विविध ठिकाणी फेकून दिले.
पोलिसांकडे व्यंकटेश्वर बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. मोबाईल लोकेशन, कॉल रेकॉर्ड आणि तांत्रिक तपास करून पोलिसांनी सुगावा शोधण्याचा प्रयत्न केला. शेवटी संशायची सुई अशोककडे वळल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले.
पोलीस तपासात अशोकने एकट्याने नसून दोन साथीदारांच्या मदतीने व्यंकटेश्वरचा मृतदेह लपवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या प्रकरणी तिघांनाही अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून इतरही साहित्य जप्त केल्या आहेत. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.