six children drown during Ganesh Visarjan in Telangana Saam TV Marathi
देश विदेश

Ganesh Visarjan : बाप्पाला निरोप देताना होत्याचे नव्हते झाले, एकाच वेळी ६ मुलांचा बुडून मृत्यू, गावावर शोककळा

six children drown during Ganesh Visarjan in Telangana : तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात गणपती विसर्जनावेळी मोठी दुर्घटना घडली. नेरेडू चेरुवू तलावात बुडून सहा मुलांचा मृत्यू झाला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

Telangana Ganesh Visarjan Tragedy: तेलंगणामधून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. संगारेड्डी जिल्ह्यात गणपती विसर्जन करताना तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने ६ मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी गेलेल्या या लहान मुलांचा अचानक तोल गेला आणि ती खोल पाण्यात बुडाली. एकाच वेळी ६ मुलांचा जीव गेल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून, आनंदात सुरू असलेल्या विसर्जन मिरवणुकीचे रुपांतर क्षणात अत्यंत दुःखात झाले आहे.

बुधवारी तीन दिवसांच्या गणपती गणरायाला देशभरात निरोप दिला. पण विसर्जन मिरवणुकीवर तेलंगणात दुखाचे सावट पसरले. येथील पेड्डाकंजेर्ला गावात गणेश मूर्तींचे विसर्जन करताना सहा मुले बुडून मरण पावली. अपघाताची बातमी पसरताच घटनास्थळी मोठ्या संख्येने लोक जमले. या दुर्घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, पेड्डाकनजेर्ला गावातील काही मुले गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी नेरेडू चेरुवू येथे गेली होती. विसर्जनादरम्यान ६ मुले पाण्यात उतरली होती. ती खोल पाण्यात पोहोचली आणि बुडू लागली. मुलांना पोहता येत नव्हते आणि त्यामुळे खोल पाण्यात उतरल्यावर ते स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नाहीत, असे काही गावकऱ्यांनी सांगितले. या घटनेनंतर, घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण प्रयत्न अपुरे ठरले.

स्थानिक मीडियाच्या माहितीनुसार, दुर्घटनेत मृत्यू पावलेली सहाही मुले शिरीषा चॅरिटेबल ट्रस्टद्वारे चालवल्या जाणाऱ्या एका शैक्षणिक संस्थेचे विद्यार्थी होते. या सहा मुलांच्या मृत्यूच्या बातमीने कुटुंबावर शोककळा पसरली. संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांची पथके घटनास्थळी दाखल झाली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून अपघाताशी संबंधित माहिती गोळा करण्यास सुरुवात केली.

ही दुर्घटना नेमकी कशी झाली? याचा शोध घेतला जात आहे. ही मुले खोल पाण्यात कशी पोहोचली आणि त्यावेळी सुरक्षेसाठी काय उपाययोजना करण्यात आल्या होत्या? याचा तपास करण्यात येत आहे. पोलीस आणि प्रशासन या घटनेचा तपास करत आहेत. मृत मुलांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी रूग्णालयात पाठवले आहेत. स्थानिक पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Puran Poli Recipe : पहिल्याच प्रयत्नात बनवा मऊसूत पुरणपोळी; गणपतीला दाखवा नैवेद्य, चव चाखतच राहाल!

Diabetes and liver damage: शरीरात अचानक ही 5 लक्षणं दिसू लागली तर व्हा सावध; डायबेटीसमुळे लिव्हर होतंय खराब

Maharashtra News Live Update: धाराशिव मध्ये मराठा आंदोलक आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा आंदोलकांचा राडा

India Fort : डोंगरावर नाही, चक्क सपाट जमिनीवर उभा आहे 'हा' अभेद्य किल्ला, तुम्ही कधी पाहिलाय का?

PF च्या नवीन निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची चांदी! कुटुंबाला मिळणार विम्याचे दुप्पट पैसे

SCROLL FOR NEXT