Saam Tv
पाणीपुरी हा भारतातील सर्वात लोकप्रिय स्ट्रीट फूडपैकी चाट म्हणून खाल्ला जाणार पदार्थ आहे.
घरी चाट पार्टीचे आयोजन करत असाल, तर पाण्याच्या वेगवेगळ्या चवींमुळे पाणीपुरी आणखी खास बनू शकतात.
पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, लिंबू आणि काही मसाले वापरून तुम्ही घरीच स्वादिष्ट पाणीपुरीचे पाणी बनवू शकता.
सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात पुदीना, अदरक, हिरवी मिर्ची आणि चिंचेच पाणी घालून पेस्ट तयार करा.
हे मिश्रण एका भांड्यात घेउन त्यामध्ये काळे मिठ, भाजलेल्या जिऱ्याची पावडर, काळी मिरी पुड आणि थोडी साखर घाला.
या मिश्रणात साधे किंवा थंड पाणी घालून सर्व मिश्रण चांगले ढवळून घ्या.
पाणीपुराला थोडा ट्वीस्ट देण्यासाठी त्यामध्ये नंतर खारी बूंदी मिक्स करुन पाणी तयार करा .
पाणीपुरीचे पाणी 6-7 तासांसाठी थंड करायला फ्रीजमध्ये ठेवा किंवा त्यामध्ये बर्फ घालून ठेऊन द्या.
पाण्याची चव फक्त एकाच प्रकारची नसते. थोडा बदल करून तुम्ही बडीशेप, हिंग किंवा कच्ची कैरी घालून पाणीपुरीच्या पाण्याची चव वाढवा