Telengana BJP Manifesto Released Saam Tv
देश विदेश

Telengana BJP Manifesto: राम मंदिराची मोफत यात्रा, फ्री लॅपटॉप आणि 4 सिलिंडरही देणार; तेलंगणासाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

Telangana Election: राम मंदिराची मोफत यात्रा, फ्री लॅपटॉप आणि 4 सिलिंडरही देणार; तेलंगणासाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

Satish Kengar

Telengana BJP Manifesto Released:

तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने शनिवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, भाजप तेलंगणात समान नागरी संहिता लागू करेल, 4 टक्के मुस्लिम कोटा रद्द केला जाईल आणि अयोध्येतील राम मंदिराला मोफत यात्रेवर भक्तांना घेऊन जाण्यात येईल.

काँग्रेसने गेल्या 70 वर्षात राम मंदिराच्या उभारणीत अडथळा आणला आणि दिरंगाई केली, असा आरोप त्यांनी केला. शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराचे भूमिपूजन केले होते आणि 22 जानेवारी 2024 रोजी प्राणप्रतिष्ठा केली जाईल. ते म्हणाले, पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकार सर्व लोकांना अयोध्येत प्रभू रामाचे मोफत दर्शन घेण्याची व्यवस्था करेल. तसेच मॉफत लॅपटॉप आणि सिलिंडरही देणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तेलंगणामधील 119 सदस्यीय विधानसभेसाठी 30 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. राज्यातील केसीआरच्या नेतृत्वाखालील भारत राष्ट्र समिती (बीआरएस) सरकारवर निशाणा साधत ते म्हणाले की, त्यांनी मुस्लिमांना धर्माच्या आधारावर आरक्षण दिले, जे असंवैधानिक आहे. राज्यात भाजपचे सरकार आल्यास धर्माच्या आधारे दिलेले आरक्षण रद्द करून ओबीसी (इतर मागासवर्गीय) आणि अनुसूचित जमातीचा (एसटी) कोटा वाढवला जाईल. (Latest Marathi News)

काँग्रेस आणि बीआरएस हे दोन्ही मागासवर्ग विरोधी पक्ष असल्याचे सांगून त्यांनी दावा केला की, केवळ भाजप आणि पंतप्रधान मोदीच मागासवर्गीयांचे कल्याण करू शकतात. मागासवर्गीयातून येणाऱ्या नेत्याला राज्याचा मुख्यमंत्री करण्याच्या भाजपच्या आश्वासनाचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

शाह आपल्या भाषणात म्हणाले की, केसीआर सरकारने खोटी आश्वासने देण्याचा जागतिक विक्रम केला आहे. तेलंगणातील लोकसंख्येमध्ये ओबीसींचा 52 टक्के वाटा असल्याचा उल्लेख करून शाह म्हणाले की, भाजप सत्तेवर आल्यास या समाजातील एका नेत्याला मुख्यमंत्रीपद दिले जाईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: महाराष्ट्रात पैशांची ढगफुटी; निवडणुकीत शेकडो कोटीचा धुरळा

Assembly Election: बारामती नको,शिरुर हवं; स्वत:अजित पवारांनीच केला खुलासा

Maharashtra Election: महायुतीसाठी RSSचे स्पेशल 65; मविआची प्रत्येक चाल ठरवणार फोल?

Maharashtra Election : भाजपचा नारा, काँग्रेसचं उत्तर; बटेंगेचं फावणार की जुडेंगे जिंकणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

Ajit Pawar : 'बारामतीतून उभं राहणार नव्हतो, तर....'; भरसभेत अजित पवारांचा मोठा खुलासा, VIDEO

SCROLL FOR NEXT