भारत राष्ट्र समिती म्हणजेच बीआरएसच्या आमदार लस्या नंदिता यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. कार अनियंत्रित झाल्यानंतर डिव्हाडरला धडकली. लस्या या सिकंदराबाद कॅन्टोन्मेंटच्या आमदार होत्या. बीआरएस प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी लस्या यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. बीआरएसचे कार्याध्यक्ष केटी रामाराव यांनीही लस्या निधनावर शोक व्यक्त केला.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी नंदिता आपल्या एसयूव्ही कारमधून प्रवास करत होत्या. संगारेड्डी जिल्ह्यातील अमीनपूर मंडलातील सुलतानपूर आऊटर रिंग रोडवर त्यांची कार डिव्हायडरला धडकली. यामुळे लस्या गंभीर जखमी झाल्या. या अपघातात चालकही गंभीर जखमी झाला आहे. दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांना लस्या यांना मृत घोषित केले. तर चालकावर सध्या उपचार सुरू आहेत.
लस्या नंदिता यांचे वडील सायन्ना हे सिकंदराबाद कॅन्टोन्मेंट येथून आमदार होते. मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये त्यांचं दीर्घ आजाराने निधन झालं.त्यांच्या निधनानंतर लस्या पहिल्यांदा नोव्हेंबर 2023 च्या निवडणुकीत जिंकून आल्या होत्या.
लस्या यांच्या कारला याआधीही अपघात झाला होता. 10 दिवसांपूर्वीही एक मुलगी अपघातातून थोडक्यात बचावली होती. 13 फेब्रुवारी रोजी नरकेतपल्ली येथे त्यांच्या कारला अपघात झाला होता. ज्यामध्ये त्यांना किरकोळ दुखापत झाली होती. या अपघातात त्यांच्यासोबत असलेल्या होमगार्डचा मृत्यू झाला होता. मात्र पुन्हा एकदा त्यांच्या कारला अपघात झाला आणि ज्यात त्यांना आपला जीव गमवावा लागला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.