Telangana Private Bus Accident Saam tv
देश विदेश

Bus Accident News : घाटात भीषण अपघात! ५४ प्रवाशांना अंत्यविधीसाठी घेऊन जाणारी बस पलटली; ४ महिलांचा मृत्यू

Telangana Bus Accident Update News : तेलंगणातील विकाराबाद जिल्ह्यात अनंतगिरी घाट रस्त्यावर खासगी बस पलटी होऊन चार महिलांचा मृत्यू झाला. अनेक प्रवासी जखमी असून सात जण गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Alisha Khedekar

  • तेलंगणातील विकाराबाद जिल्ह्यात अनंतगिरी घाट रस्त्यावर भीषण अपघात

  • खासगी बस पलटी होऊन अपघात

  • या दुर्घटनेत चार महिलांचा मृत्यू

  • गावातील सुमारे ५४ प्रवासी अंत्यविधीसाठी जात असताना घडला अपघात

तेलंगणातील विकाराबाद जिल्ह्या बसचा भीषण अपघात झाला. अनंतगिरी घाट रस्त्यावर गावकऱ्यांना घेऊन जाणारी खासगी बस उतारावरून जात असताना अचानक पलटी झाली. या दुर्घटनेत चार महिलांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. बसचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पटनचेरू येथील केसरम गावातील सुमारे ५४ प्रवासी चिताकुंटा गावात एका अंत्यविधीसाठी जात होते. याचदरम्यान अनंतगिरी हिल्स परिसरातील घाट रस्त्याच्या उतारावर ही दुर्घटना घडली. बस उतारावरून खाली येत असताना चालकाला वाहनावर नियंत्रण ठेवता आले नाही. त्यानंतर बस रस्त्यावरून घसरून उलटली.

या अपघातात यदम्मा, पद्मम्मा आणि प्रमिला या तीन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर चौथ्या मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. अपघाताची तीव्रता एवढी होती की, बसमधील काही प्रवासी वाहनात अडकले होते. अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्यासाठी मदत केली.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुमारे सात प्रवाशांना गंभीर दुखापत झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. या दुर्घटनेनंतर अनंतगिरी घाट परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अपघाताचा तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार गर्जना मोर्चात सहभागी होणार

UPI वरून पेन्शन खातं उघडता येणार; BHIM अॅपवर काही मिनिटांत रजिस्ट्रेशन, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सप्टेंबरचा ₹१५०० चा हप्ता 'या' दिवशी होणार जमा, वाचा मोठी अपडेट

Mountain Climbers Benefits: वजन झपाट्याने कमी करायचं आहे? मग सकाळची सुरुवात माउंटेन क्लाइंबर्सने करा

PM Kisan Yojana : ...तर PM किसान योजनेचा २४ वा हप्ता येणार नाही खात्यात; आजचं करा 'ही' महत्त्वाची ४ कामे

SCROLL FOR NEXT