Telangana Highway Accident  Saam TV Marathi news
देश विदेश

Accident : खडीने भरलेल्या ट्रकची प्रवासी बसला जोरात धडक, २० जणांचा जागेवरच मृत्यू, अनेकजण जखमी

Telangana bus accident kills 20 : तेलंगणातील विकाराबाद येथे खडीने भरलेल्या ट्रकने आरटीसी बसला जोरदार धडक दिल्याने २० जणांचा जागीच मृत्यू झाला. १० हून अधिक प्रवासी जखमी आहेत. ट्रकवरील खडी बसमधील प्रवाशांवर पडल्याने मृतांची संख्या वाढली.

Namdeo Kumbhar

Telangana Highway Accident 20 Die as Truck Crushes Bus Passengers : तेलंगणामध्ये खाडी घेऊन जाणारा ट्रक आणि ५० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झालाय. विकाराबाद जिल्ह्यातील चेवेल्लामधील खानपूर गेटजवळ सोमवारी सकाळी भयंकर अपघात झाला. विरुद्ध दिशेने येणाऱ्या आरटीसी बसला खडीने भरलेल्या ट्रकने जोरात धडक दिली. या भीषण अपघातामध्ये २० जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १० जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर महामार्गावर एकच आक्रोश होता. खडीच्या खाली अनेकजण अडकले असल्याची माहिती समोर येत आहे. अपघाताची माहिती मिळताच तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. जखमींना जवळचया रूग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. (Telangana Accident: 20 Killed as Gravel-Loaded Truck Rams Passenger Bus in Vikarabad )

विजापूर महामार्गावरील हा अपघात इतका भयानक होता की खडीखाली दबल्यामुळे अनेक प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. मृताची संख्या २० वर पोहचली आहे. तर १० पेक्षा जास्त जखमी आहेत. त्यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजतेय. वाहतूक मंत्री पन्नम प्रभाकर यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने मदत करण्याचे आणि जखमींना उपचार मिळावेत असे निर्देश दिले आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाले अन् मदतकार्य सुरू करण्यात आले. पोलिसांकडून ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. ट्रकने विरूद्ध दिशेला जात बसला समोरून जोरात धडक दिली. ट्रकमधील खडी बसमधील प्रवाशांच्या अंगावर पडल्याने मृताची संख्या वाढल्याचे स्थानिकांनी सांगितलेय. अपघातामधील जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आले.

येथील डीसीपी योगेश गौतम यांनी तात्काळ अपघाताबाबत माहिती घेऊन योग्य त्या सूचना केल्या आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, बसला धडक दिली तेव्हा ट्रक उजव्या लेनमध्ये होता. ट्रक चालक ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना अपघात झाला की तो चुकीच्या दिशेने गाडी चालवत होता याचा तपास करावा लागेल. दुर्घटना झाली, त्यावेळी बसमध्ये ५० हून अधिक प्रवासी होते. धक्कादायक म्हणजे, भीषण अपघातानंतर ट्रकमधील खडी प्रवाशांवर पडली. हा अपघात विजापूर महामार्गावर झाला. आम्ही बसमधून मृतदेह आणि जखमींना काढून रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leopard Terror: 15 दिवसांत बिबट्याने घेतला तिघांचा बळी,'नरभक्षक बिबट्याला गोळ्या घाला', गावकरी आक्रमक

Vote Chori: व्होटचोरीला हिंदू-मुस्लीमचा रंग; बोगस मतदारांचा फायदा नेमका कुणाला?

Maharashtra Politics: हर्षवर्धन पाटील पुन्हा भाजपच्या वाटेवर? भरसभेत मुख्यमंत्री,पंतप्रधानांचे गायले गोडवे

BMC Election : आगामी निवडणुकीत RPI महायुतीतून लढणार, पण...; रामदास आठवलेंनी सगळंच सांगितलं

₹23 Crore Bull Not Dead: 23 कोटींच्या 'अनमोल'चा मृत्यू? हट्टाकट्टा रेड्याला अचानक काय झालं?

SCROLL FOR NEXT