Tejas Mk1a First Aircraft  ANI
देश विदेश

Tejas Fighter Plane: देशाच्या नव्या फायटर जेट तेजसं Mk1A चं यशस्वी उड्डाण; जाणून घ्या किती घातक आहे फायटर जेट

Tejas Mk1a First Aircraft : भारताचं नवं फायटर जेट तेजस एमके १ए Mk1Aचं आज परीक्षण घेण्यात आलं. या फायटर जेटची डिलिव्हरी मार्च २०२४ ते फेब्रुवारी २०२८ च्या दरम्यान होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Tejas Mk1a First Aircraft :

भारताचं नवं फायटर जेट तेजस एमके १ए Mk1Aचं आज परीक्षण घेण्यात आलं. हिदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार,तेजस Mk1A विमान श्रेणीमधील पहिल्या LA5033 विमानाचं आज बेंगळुरूमध्ये यशस्वी उड्डाण करण्यात आले. हे फायटर जेट आकाशात तब्बल १८ मिनिटे आकाशात उडत होते. (Latest News)

केंद्र सरकारने २०२१ मध्ये ८३ उन्नत तेजस एमके-१ ए जेटसाठी ४६,८९८ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलाय. या फायटर जेटची डिलिव्हरी मार्च २०२४ ते फेब्रुवारी २०२८ च्या दरम्यान होणार आहे. भारतीय हवाई दलाजवळ आधीपासूनच दोन तेजस स्क्वाड्रन,प्लाइंग डेगसे आणि प्लाइंग बुलेट्स आहेत,हे फायटर जेट दक्षिण-पश्चिम क्षेत्रात तैनात करण्यात आलेत. मागील विमानाच्या तुलनेत फायटर जेट तेजस एमके-१ए मध्ये अनेक आधुनिक टेक्नोलॉजी वापरण्यात आलीय. तसेच यात अनेक सुधारणा करण्यात आलीय.

या फायटर जेटमध्ये प्रगत इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर (EW) हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर शस्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे. या फायटर जेटमध्ये हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि बाह्य स्व-संरक्षण जॅमरसह बसवलेले आहेत. विदेशी जेट विमानांच्या जागी तेजस हे लढाऊ विमान आगामी काळात भारतीय हवाई दलाचे मुख्य लढाऊ विमान बनणार आहे. सुरक्षा पीएसयू एचएएल तेजस एमके १ ए या एलसीए एमके १ ए तयार करण्यात आले आहे. या विमानाला बेंगळुरूमधील डीआरडीओ लेब एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीद्वारे विकसीत केलं जाणार आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी भारताच्या सीमा पूर्णपणे सुरक्षित आहेत.देशाच्या नागरिकांना सशस्त्र दलावर विश्वास ठेवला पाहिजे. अग्निवीर योजनेवर टीका करणाऱ्यांना राजनाथ सिंह यांनी उत्तर दिलंय. विरोधकांच्या टीकेला कोणतेच तथ्य नाहीये. सशस्त्र दल युवा असलं पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Fire News: आधारवाडीतील इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग

DY chandrachud : एखादा पक्ष ठरवणार का, सुप्रीम कोर्टात निर्णय काय घ्यायचा? ठाकरे गटाच्या आरोपांना चंद्रचूड यांचं प्रत्युत्तर

Saim Ayub: वनडे क्रिकेटच्या इतिहासात जे कोणालाच जमलं नाही, ते सॅम अयूबने करुन दाखवलं

Beetroot Benefits: हिवाळ्यात बीट खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Constitution Day : संविधान वर्तमान आणि भविष्याचे मार्गदर्शक; संविधान दिनी PM मोदींचा दहशतवाद्यांनाही कडक इशारा

SCROLL FOR NEXT