CPR  Saam tv
देश विदेश

CPR Controversy : महिलेला CPR देणे शिक्षकाला पडलं महागात; चुकीच्या पद्धतीने हात लावल्याचा आरोप

CPR controversy news : महिलेला CPR देणे शिक्षकाला महागात पडलंय. शिक्षकावर महिलेला चुकीच्या पद्धतीने हात लावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Vishal Gangurde

चीनमध्ये महिला रस्त्यावर कोसळल्यानंतर शिक्षकाने सीपीआर दिला.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर शिक्षकावर चुकीच्या पद्धतीने हात लावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

शिक्षक पॅन नेटकऱ्यांच्या टीकेमुळे तो मानसिक तणावात आहे.–

या घटनेमुळे सोशल मीडियावर ‘मदतीची भीती’ या चर्चेला पुन्हा उधाण आलंय.

एका शिक्षकाला महिलेला सीपीआर देणे महागात पडलं आहे. शिक्षकावर महिलेच्या छातीला चुकीच्या पद्धतीने हात लावल्याचा आरोप होत आहे. महिलेच्या आरोपानंतर शिक्षकाने म्हटलं की, सीपीआर देणे ठाऊक आहे. माझ्या सीपीआर देण्याच्या पद्धतीवर कोणीही प्रश्न उपस्थित केले नाहीत. महिलेच्या आरोपामुळे शिक्षकाचं टेन्शन वाढलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, संपूर्ण प्रकरण चीनचं आहे. सेंट्रल हुनान प्रांतात हेंनयांगमध्ये १२ जुलै रोजी एक महिला रस्त्यावर अचानक कोसळली. महिला कोसळल्यानंतर एक महिला डॉक्टर सीपीआर द्यायला पोहोचली. महिला डॉक्टर सीपीआर देऊन थकली. त्यानंतर तिने दुसऱ्यांना मदतीसाठी विनंती केली. त्यानंतर पॅन नावाचा व्यक्ती मदतीसाठी पुढे आला.

मेडिकल शाळेत शिक्षक असलेला पॅन मदतीसाठी धावले. त्यांना सीपीआर देण्याची पद्धत ठाऊक होती. महिला डॉक्टर आणि पॅन यांनी आळीपाळीने मिळून महिलेला सीपीआर दिला. त्यानंतर डॉक्टरने रुग्णवाहिकेला बोलावून घेतलं. १० मिनिटांनंतर महिला शुद्धीवर आली आणि तिने डोळे उघडले. महिलेला रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले.

सीपीआर देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी पॅन यांच्यावर महिलेला चुकीच्या पद्धतीने हात लावल्याचा आरोप केला. नेटकऱ्यांच्या टीकेमुळे पॅन यांनी म्हटलं की, 'मला भीती वाटत आहे. मला माहीत असतं की, माझ्यावर टीका होईल. तर मी मदतीसाठी पुढे आलो नसतो'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिरूरमध्ये कांदा लागवडीला वेग; महिलांनी पावसासाठी घातले साकडे

UPI New Rules : UPI युजर्सला मोठा धक्का, ५ हजारांपेक्षा जास्त पाठवल्यास चार्ज लागणार; जाणून घ्या सरकारचा नवा नियम

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

SCROLL FOR NEXT