Viral Video Saam TV
देश विदेश

Viral Video : शिक्षिकेने वर्गात 'पतली कमरीया...' गाण्यावर लगावले ठुमके; मॅडमच्या अदापाहून विद्यार्थ्यांनी धरला ताल

वर्गात सर्व मुल मुली आपआपल्या जागेवर आहेत आणि शिक्षीका 'पतली कमरीया...' या भोजपूरी गाण्यावर डान्स करत आहे.

साम टिव्ही ब्युरो

Viral Video :आजकाल प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियावर अॅक्टीव आहे. तरुणाईसह लहान मुलं आणि आनेक वृद्ध व्यक्तींना देखील रील्स व्हिडिओ बनवण्याचं वेड लागलं आहे. शाळेत प्रत्येक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी जात असतो. मात्र एका शिक्षिकेने मुलांबरोबर रील व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ पाहून कदाचीत तुम्हाला या शिक्षिकेचा राग येऊ शकतो. कारण शिक्षिका एका भोजपुरी गाण्यावर वर्गात जबरदस्त ठुमके मारत आहे आणि विद्यार्थ्यांनी देखील तिच्याबरोबर ताल धरला आहे.

शाळेत (School) महिला शिक्षिकांना आजवर तुम्ही ओरडताना, शिक्षा करताना किंवा मुलांना काही गोष्टी सांगताना पाहिलं असेल. अशात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये शिक्षिकेने सुंदर साडी नेसली आहे. वर्गात सर्व मुल मुली आपआपल्या जागेवर आहेत आणि शिक्षीका 'पतली कमरीया...' या भोजपूरी गाण्यावर डान्स(Dance) करत आहे. शाळेतील सर्व विद्यार्थी देखील तिला यात साथ देताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर या १० सेकंदाच्या व्हिडिओने हवा केली आहे. काही युजर शिक्षिकेचे ठुमके पाहून आम्ही शाळेत असताना आम्हाला अशी मॅडम का नाही मिळाली, असं म्हणत आहेत. काही तासांतच या व्हिडिओला ५० हजारांहून अधिक लोकांनी पाहिले आहे. तसेच या व्हिडिओला २६०० पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. @Gulzar_sahab या ट्वीटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय.

या व्हिडिओवर आलेल्या मजेशीर कमेंट्स देखील लक्ष वेधनाऱ्या आहेत. एका युजरणे लिहिले आहे की, आमच्या मॅडमतर रोज हातात छडी घेऊन यायच्या. व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रियेसह काहींनी यावर नाराजी देखील व्यक्त केली आहे. प्रत्येकाने आपल्या पदाचे भान ठेवावे, असे एकाने कमेंटमध्ये म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी द्यावी, खासदार प्रतिभा धानोरकरांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन

Snake Bite : नुकसानीचे पंचनामे करताना तलाठ्याला सर्पदंश; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Pakistan: पाकिस्तानला पुन्हा हादरा! पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू

Hair Wash Routine: आठवड्यातून किती वेळा धुवावेत केस? जाणून घ्या पद्धत

Hidden Mumbai Places: गर्दीपासून दूर कपल्ससाठी परफेक्ट Top 7 स्पॉट्स; विकेंडला जोडीदार होईल खुश

SCROLL FOR NEXT