Uttar Pradesh Crime Saam Tv
देश विदेश

Crime: धावत्या ट्रेनमध्ये टीसीने केला विद्यार्थिनीवर बलात्कार; तिकीट चेक करताना पकडलं नंतर एसी कोचमध्ये नेत...

Uttar Pradesh Crime: धावत्या ट्रेनमध्ये तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली. टीसीने या तरुणीसोबत हे भयंकर कृत्य केले. या टीसीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Priya More

Summary -

  • धावत्या ट्रेनमध्ये टीसीने विद्यार्थिनीवर केला बलात्कार

  • सीट देतो म्हणून एसी कोचमध्ये नेऊन केलं भयंकर कृत्य

  • उत्तर प्रदेशच्या मऊमध्ये ही घटना घडली

  • आरोपी टीसी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत

उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये धावत्या ट्रेनमध्ये टीसीने तरुणीवर बलात्कार केला. अहमदाबाद- गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये ही घटना घडली. ही तरुणी भारतीय सैन्य दलामध्ये नोकरी मिळवण्यासाठी भरतीची तयारी करत होती. ती ट्रेनने विना तिकीट प्रवास करत होती. तिकीट तपासणीदरम्यान टीसीने तिला पकडले. यावेळी तुला सीट मिळवून देतो असं सांगत टीसी तिला सोबत घेऊन गेला आणि त्याने तिच्यासोबत भयंकर कृत्य केले. पोलिसांनी या टीसीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी एनसीसी सी-सर्टिफिकेटची परीक्षा देण्यासाठी मऊला गेली होती. त्याठिकाणावरून ती परत येत होती पण जास्त गर्दी असल्यामुळे तिला तिकीट मिळाले नाही. त्यामुळे ती एसी कोचमध्ये चढली. त्यावेळी त्याठिकाणी टीसी आला. त्याने तिकीट तपासणीसाठी मागितले. तर पीडितेने तिकीट नसल्याचे सांगितले. सीट मिळवून देतो असे सांगून टीसी तिला आपल्या केबिनमध्ये घेऊन गेला. तरुणीला केबिनमध्ये बसून त्याने आतून कडी लावली. त्याठिकाणी त्याने तिच्यावर बलात्कार केला.

जर तू कुणाला काही सांगितले तर तुझ्यावर कारवाई केली जाईल असे त्याने तिला धमकावले. ही घटना रविवारी रात्री इंदारा- देवरिया रेल्वे स्थानकादरम्यान घडली. या घटनेनंतर पीडित तरुणीने डायल- ११२ क्रमांकावर फोन करून घटनेची माहिती दिली. आरोपी टीसी देवरियामध्ये ट्रेनमधून उतरून फरार झाला. गोरखपूरला पोहचल्यानंतर पीडित तरुणीने जीआरपी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी टीसीविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला आहे.

पीडित तरुणी मऊ जिल्ह्यातील रहिवासी आहे. ती गोरखपूरमध्ये भाड्याने घर घेऊन राहते. ती भारतीय लष्करामध्ये नोकरी मिळवण्यासाठी तयारी करत आहे. ती एनसीसीच्या सी-सर्टिफिकेटची परीक्षा देण्यासाठी मऊ येथे गेले होती. परीक्षेनंतर ती परत येत असताना तिच्यावर धावत्या ट्रेनमध्ये टीसीने बलात्कार केला. या घटनेमुळे उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली. पोलिस आरोपी टीसीचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT