Glass Bridge Saam Tv
देश विदेश

Glass Bridge: कन्याकुमारीमध्ये काचेचा पूल! नव्या वर्षात पर्यटकांसाठी होणार खुला

Kanyakumari Glass Bridge: कन्याकुमारीला अधिक पर्यटक आकर्षित होण्यासाठी पुतळा- विवेकानंद रॉक मेमोरियल यांना जोडणारा काचेच्या पुल बांधण्यात येत आहे. पुढच्या वर्षी या पुतळ्याचे उद्घाटन होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रणजित माजगावकर, साम टीव्ही प्रतिनिधी

तामिळनाडू राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहे. त्यामुळेच कन्याकुमारीला अधिक पर्यटक आकर्षित करण्यासाठी ‘तिरुवल्लुवर पुतळा- विवेकानंद रॉक मेमोरियल यांना जोडणारा काचेच्या पुलाचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. या पुलाचा नव्या वर्षात लोकार्पण सोहळा होणार आहे. त्यामुळे येथे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे.

आपल्या देशातील शेवटचं टोक म्हणून कन्याकुमारीला ओळखले जाते. कन्याकुमारी इथे जगप्रसिद्ध ‘तिरुवल्लुवर पुतळा- विवेकानंद रॉक मेमोरियलला जगभरातील पर्यटक भेट देत असतात. या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी तामिळनाडू सरकारच्या वतीने ‘तिरुवल्लुवर पुतळा- विवेकानंद रॉक मेमोरियल यांना जोडणारा महत्वकांक्षी काचेचा पुल बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

तिरुवल्लुवर पुतळ्याला विवेकानंद रॉक मेमोरियलशी जोडणाऱ्या 77 मीटर लांबीच्या कव्हर काचेचा पुल 37 कोटी खर्चून बांधण्यात येत आहे. या काचेच्या पुलामुळे पर्यटक विवेकानंद रॉक मेमोरियलपासून फेरीची वाट न पाहता तिरुवल्लुवर पुतळ्यापर्यंत पोहोचू शकतील. त्यामुळे पर्यटकांचा बराच वेळ वाचेल. हा पूल 10 मीटर रुंद असेल. विवेकानंद रॉक मेमोरियल आणि तिरुवल्लुवर पुतळा खडक इथं काँक्रीट खांबांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तर ‘नेटवर्क कमान’ बसविण्यात आली आहे. प्रीफेब्रिकेटेड स्टील स्ट्रक्चर्स उभारण्याचं काम सध्या सुरू असून नव्या वर्षात पर्यटकांना एक सुंदर असा काचेचा पुल पाहायला मिळणार आहे.

कन्याकुमारीला जोडण्यात येणाऱ्या या काचेच्या पुलामुळे पर्यटकांची जास्त गर्दी होणार आहे. त्यामुळे तेथील पर्यटन व्यवसायालादेखील चालना मिळेल. त्यामुळेच रोजगाराच्यादेखील संधी उपलब्ध होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT