Tamil Nadu Crime News Saam TV
देश विदेश

Tamil Nadu News: दुर्दैवी घटना! लग्नात जेवण वाढायला गेला, उकळत्या सांबारच्या कढईत पडला 21 वर्षांचा तरुण

Latest News: या घटनेचा तपास तामिळनाडू पोलिसांकडून (Tamil Nadu Police) सुरु आहे.

Priya More

Tamilnadu Crime News: तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) मन सुन्न करणारी घटना घडली आहे. लग्न सोहळ्यादरम्यान (Marriage) एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. उकळत्या सांबारच्या कढईमध्ये पडून या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर भर लग्नातल्या आनंदावर विरजण पडले. या घटनेचा तपास तामिळनाडू पोलिसांकडून (Tamil Nadu Police) सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूतील तिरुवल्लूर जिल्ह्यातील लग्न सोहळ्यात ही दुर्घटना घडली आहे. 21 वर्षीय तरुण चुकून गरम सांबारच्या कढईमध्ये पडला. गरम सांबारमध्ये पडल्यामुळे हा तरुण गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान 30 एप्रिल रोजी या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी तरुणाला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेला तरुण कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. शिक्षण करता करता तो एका केटरिंग फर्ममध्ये काम करत होता. गेल्या आठवड्यात जेव्हा ही घटना घडली तेव्हा हा तरुण एका लग्न समारंभात पाहुण्यांना जेवण वाढत होता. यावेळी सांबार संपल्यामुळे तो ते आणण्यासाठी गरम कढईजवळ गेला. त्यावेळी तोल जाऊन तो उकळत्या सांबारच्या कढईमध्ये पडला.

या घटनेनंतर लग्नसमारंभात एकच गोंधळ उडाला. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या तरुणाला त्याठिकाणी उपस्थित असलेल्या पाहुण्यांनी शहरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे या तरुणाच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या घटनेप्रकरणी तामिळनाडू पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wheat Chocolate Cake: मैदा नाही तर गव्हाच्या पीठापासून मुलांसाठी बनवा हेल्दी चॉकलेट केक, वाचा सोपी रेसिपी

Nagpur : जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यानं कारागृहातच स्वत:ला संपवलं, अंतर्वस्त्रानंच....

Akola Crime : धक्कादायक! अकोल्यात एमडी ड्रग्स तस्करी; आरोपीचं वंचित बहुजन आघाडीचं कनेक्शन उघड

PAN Card: तुम्हीही अजून पॅन कार्ड-आधार कार्डसोबत लिंक केलं नाही? नवा नियम लागू, बसेल मोठा फटका

Maharashtra Live News Update: मावळमध्ये एसटी बस आणि खासगी बसचा अपघात, 11 प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT