TamilNadu Accident Saamtv
देश विदेश

Tamil Nadu Bus Accident: तामिळनाडूमध्ये भीषण बस अपघात! दोघांचा मृत्यू; ७० जण जखमी

नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यास मदत केली.

Gangappa Pujari

Tamil Nadu News: तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu Accident) एका भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. तामिळनाडूतील कुड्डालोर जिल्ह्यातील मेलपट्टमपक्कम येथे दोन खासगी बसच्या समोरासमोर झालेल्या धडकेत चौघांचा मृत्यू झाला आहे. तसेच या भीषण अपघातात सुमारे ७० जण जखमी झाले आहेत. जखमींना कुड्डालोर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कुड्डालोर (Tamilnadu) जिल्ह्यातील नेल्लीकुप्पमजवळील पट्टमबक्कम दोन खाजगी बसमध्ये हा अपघात झाला. एका बसचा पुढचा टायर फुटल्याने तिचे नियंत्रण सुटले आणि विरुद्ध बाजूने येणाऱ्या दुसऱ्या बसची समोरासमोर धडक झाली. जखमींना कुड्डालोर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघात एवढा भीषण होता की दोन्ही बसच्या समोरील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला आहे. अपघातानंतर लगेचच नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यास मदत केली. (Accident News)

दरम्यान, १८ जून रोजी पाकिस्तानमध्येही अशीच भीषण बस अपघाताची घटना घडली होती.  पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात शनिवारी रात्री बसला भीषण अपघात झाला. इस्लामाबाद-लाहोर महामार्गावर प्रवाशांनी भरलेली बस (Bus overturns on highway) उलटली.  या भीषण अपघातामध्ये 13 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर 24 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: एमपीएससी पेपर फुटी प्रकरणात मुंबई पोलिसांकडनं तपासाला गती

Gold Rate Today: रक्षाबंधनाला सोनं खरेदीची सुवर्णसंधी, 10 तोळा सोनं 31600 रुपयांनी स्वस्त; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

EPFO Update : नोकरी करणाऱ्या पती-पत्नींसाठी महत्त्वाची बातमी! लग्नानंतर EPFO खात्या संबंधित 'हे' एक काम करायला विसरलात? नंतर होईल गोंधळ

Amaal Mallik Break: 'तूर्तास आपली रजा घेतो...'; प्रसिद्ध संगीतकाराचा चित्रपटसृष्टीला रामराम, कारण सांगत म्हणाला...

Weight Loss : वजन झपाट्याने कमी करण्यासाठी रोज एक वाटी प्या 'ही' डाळ, चविष्ट रेसिपी लिहून घ्या

SCROLL FOR NEXT