TVK candidate VS Babu celebrates after defeating MK Stalin in Kolathur, marking a major political upset. 
देश विदेश

Tamilnadu Assembly Election Result : सर्वात मोठी बातमी ! मुख्यमंत्र्यांचा आपल्याच बालेकिल्ल्यात दारूण पराभव; कोणी मारली बाजी?

Tamil Nadu Vidhan Sabha Chunav: तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचा त्यांच्या बालेकिल्ला असलेल्या कोलाथूर मतदारसंघात पराभव झाला आहे. टीव्हीके पक्षाचे उमेदवार व्ही. एस. बाबू यांनी त्यांचा पराभव केला आहे.

Bharat Jadhav

  • राज्यातील राजकारणात एक ऐतिहासिक बदल घडला.

  • व्ही. एस. बाबू यांनी एमके स्टॉलिनचा पराभव केला.

  • व्ही. एस. बाबू हे आधी स्टालिन यांच्याच पक्षात होते

तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि डीएमकेचे प्रमुख एमके स्टालिन यांचा सर्वात मोठा धक्का बसला आहे. ज्या मतदारसंघात एमके स्टालिन हे तीन टर्ममध्ये विजय नोंदवत होते, त्याच ठिकाणी त्यांचा दारूण पराभव झाला आहे. २०११, २०१६ आणि २०२१ मध्ये सलग विजय मिळवला होता. यावेळी विजय यांचा पराभव टीव्हीके उमेदवार व्ही. एस. बाबू यांनी केला आहे.

व्ही. एस. बाबू हे आधी स्टालिन यांच्याच पक्षात होते. २०११ मध्ये त्यांनी स्टॅलिन यांच्यासोबत कोलाथूर मतदारसंघाचे निवडणूक प्रभारी म्हणून काम पाहिले होते. नंतर त्यांनी पक्ष सोडून एआयएडीएमकेमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर ७ फेब्रुवारी २०२६ रोजी ते टीव्हीकेमध्ये सामील झाले. व्ही.एस. बाबू यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला.

स्टॅलिनचा राजकीय गड हादरला

एम. के. स्टॅलिन हे तामिळनाडूच्या राजकारणातील एक ज्येष्ठ नेते मानले जातात. ते पाचवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या एम. करुणानिधी यांचे सुपुत्र आहेत. २०१८ मध्ये त्यांच्या निधनानंतर त्यांनी डीएमके पक्षाची सूत्रे हाती घेतली होती. वर्ष २०११ मध्ये विल्लिवक्कम आणि पुरासावक्म या दोन शहरांचा भाग मिळून कोलाथूर विधानसभा मतदारसंघ बनला आहे. तेव्हापासून स्टालिन हे येथे निवडून येत होते.

अनेक मंत्री आणि ज्येष्ठ नेतेही पिछाडीवर

मतमोजणीच्या कलानुसार द्रमुकच्या अनेक प्रमुख नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागतोय. द्रमुकचे सरचिटणीस दुराई मुरुगन कटपाडी जागेवर २,२९३ मतांनी पिछाडीवर आहेत. पी. गीता जीवन (थुथुक्कुडी), मा. सुब्रमण्यम (सैदापेट्टा), ई. व्ही. वेलू (तिरुवन्नमलाई), पी. के. शेखर बाबू (बंदर), टी. एम. अनबरासन (अलंदूर), के. एन. नेहरू (त्रिची पश्चिम), गोवी चेझियान (थिरुविदाईमारुदुर), नजर (अवडी), मथिवेन्थन (आरडीआस), मथिवेन्थन (आरडीआस), आर. के.के.एस.एस.आर. रामचंद्रन आणि थंगम थेन्नारसू (त्रिची) हे देखील पिछाडीवर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NEET Paper Leak: फेरपरीक्षेचा पेपरही फुटल्याचा दावा; 21 जूनचा NEET पेपर 10 लाखांत?

NEET पेपरफुटीचा 'गॉड'फादर कोण? 'गॉड' नावाच्या नंबरवरुन संशयास्पद संवाद

माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; निकटवर्तीय महिला नेत्याने दिला पक्षाच्या पदाचा राजीनामा

Shocking: भारतमातेचं रक्षण करणाऱ्या जवानाला न्याय मिळेना; ITBP जवानावर आईचा तुटलेला हात घेऊन भटकण्याची वेळ

एक वर्षात सरकार कोसळेल; बड्या नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT