Tamil Nadu Accident Saam Tv
देश विदेश

Tamil Nadu Accident: पर्यटकांची कार दरीत कोसळली, ९ जणांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Tamil Nadu Accident 9 Died: तमिळनाडूमध्ये पर्यटकांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली आहे. यात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर चौघेजण गंभीर जखमी आहेत.

Siddhi Hande

तमिळनाडूमध्ये भीषण अपघात

पर्यटकांना घेऊन जाऊन व्हॅन दरीत कोसळली

अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू

तमिळनाडूमध्ये एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. तमिळनाडूमध्ये एक व्हॅन दरीत कोसळली आहे. या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातून येणाऱ्या या व्हॅनचा अपघात झाला आहे. हा अपघात खूप भीषण होता. वलपराई-पोल्लाची या डोंगराळ भागातून व्हॅन जाताना हा अपघात झाला आहे.यात नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर चौघेजण जखमी आहेत.

केरळच्या मल्लपुरम जिल्ह्यातील १३ जणांना ही व्हॅन घेऊन जात होती. वलपराई-पोल्लाची या डोंगराळ भागातून खाली उतरत असताना चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला. वळण घेत असताना व्हॅनने एका बॅरिकेटला धडक दिली आणि व्हॅन दरीत कोसळली. या व्हॅनचा चक्काचुर झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

या अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यात सात महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. चालक गंभीर जखमी आहे. यानंतर एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत व्यक्तींपैकी काही जण मल्लपुरम शाळेतील शिक्षक होते. ते वलपराईला जाऊन घरी परतत होते. मात्र, वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला. या घटनेनंतर पंतप्रधान मोदींना शोक व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

राज्यात घराणेशाहीची दुसरी इनिंग, मुलांच्या आमदारकीसाठी नेत्यांचं लॉबिंग, नेत्यांच्या मुलांसाठी निष्ठावंतांना डावलणार?

पुण्यात विषारी दारुचे 14 बळी, पुणे पोलीस करतायत तरी काय, संतप्त नागरिकांनी दारूचा अड्डा केला उद्ध्वस्त!

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! राज्यभर आयुर्वेदीक केंद्रांवर FDA ची कारवाई; नामांकित कंपनीचा औषधसाठा जप्त

SCROLL FOR NEXT