Tamilnadu News  Saam Tv
देश विदेश

Breaking: सी-फूड एक्सपोर्ट कंपनीमध्ये मोठी दुर्घटना, गॅसची गळती होऊन ७ महिला कामगारांचा मृत्यू

Ammonia gas leak in Tamil Nadu seafood company: तामिळनाडूमध्ये सी-फूड प्रोसेसिंग कंपनीमध्ये गॅस गळती होऊन मोठी दुर्घटना घडली. ७ महिलांचा मृत्यू झाला तर ६७ जणांची प्रकृती गंभीर आहे.

Priya More
  • तामिळनाडूमध्ये एका कंपनीत अमोनिया गॅस गळती

  • सीफूड कंपनीत ७ महिला कामगारांचा मृत्यू

  • गॅस गळतीमुळे मोठी दुर्घटना घडली

  • ६७ महिला कामगारांची प्रकृती गंभीर असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत

सी-फूड युनिटमध्ये अमोनिया गॅसची गळती होऊन ७ महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तामिळनाडूच्या तिरुवल्लूर जिल्ह्यामध्ये ही भयंकर घटना घडली. तर ६७ महिलांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तामिळनाडूच्या वेगवेगळ्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यामधील ७ महिला व्हेंटिलेटरवर आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून रुग्णालयाबाहेर रुग्णांच्या नातेवाईकांनी गर्दी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पेरियापलायमजवळील कनिगैपैर गावातील सेंट पीटर्स अँड पॉल सी फूड्स एक्सपोर्ट्स कंपनीत ही घटना घडली. गॅस गळतीनंतर कंपनीच्या परिसरात भीतीचे वातावरण आहे. या गॅस गळतीमुळे अनेक महिला कामगार बेशुद्ध पडल्या. ७ महिला कामगारांचा मृत्यू झाला. तर ६७ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत मृत्यू झालेले आणि बाधित झालेले बहुतांश कामगार हे उत्तर भारतातील आहे. उत्तर भारतातील विविध राज्यांतील ते स्थलांतरीत मजूर आहेत.

कंपनीमध्ये गॅस गळती झाल्यानंतर महिला कामगारांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला, काहींना चक्कर तर काहींना उलट्या झाल्या. यामधील काही महिला कामगारांनी जागीच प्राण सोडले. प्राथमिक तपासातून असे उघड झाले की, अमोनिया गॅसची गळती कंपनीत बसवलेल्या एका मोठ्या व्हॉल्व्हमधून झाली. या गॅस गळतीचे नेमके कारण शोधले जात आहे. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.

या घटनेची गंभीर दखल घेत तामिळनाडू सरकारने गॅस गळतीचे कारण निश्चित करण्यासाठी डीन डॉ. शांताराम यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिलेत. या समितीला सविस्तर तपास करून अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे काम सोपवण्यात आले आहे. पोलिसांनी कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला असून मालकाला अटक करण्यात आली आहे. कंपनीच्या इतर अनेक अधिकाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT