Tamil Nadu Politics: Aiadmk Leader Predicts Collapse Of Cm Vijay's Government saam tv
देश विदेश

राज्य सरकार आपोआप कोसळणार; AIADMK नेत्यानं सांगितलं कारण, मुख्यमंत्री विजय यांचं टेन्शन वाढलं

Tamil Nadu Politics : तमिळनाडूमध्ये विजय यांच्या सरकारला खरोखरच काही धोका आहे का? जर नसेल, तर मग तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्र्यांनी असा धाडसी दावा कसा केला? पलानीस्वामी यांनी हे विधान का केले, ते जाणून घेऊया.

Bharat Jadhav

  • मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारबाबत चर्चांना उधाण

  • AIADMK चे सरचिटणीस एडप्पादी के. पलानीस्वामी यांनी मोठे राजकीय भाकीत

  • विजय यांचे टीव्हीके सरकार स्वतःहून कोसळेल, असा दावा त्यांनी केला.

तमिळनाडूमध्ये थलपती विजय यांचे सरकार कोसळण्याच्या उंबरठ्यावर आहे का? टीव्हीके (TVK) सरकारसमोर काही संकट आहे का? यासंदर्भात एआयएडीएमकेच्या एका नेत्याने मोठा दावा केलाय. एआयएडीएमकेचे सरचिटणीस एडप्पादी के. पलानीस्वामी यांच्या भाकीतानुसार, तमिळनाडूतील बिघडलेली कायदा-सुव्यवस्था परिस्थितीसह विविध कारणांमुळे टीव्हीके सरकार स्वतःहून कोसळेल.

पलानीस्वामी यांनी सांगितले की, विधानसभेत AIADMK कडे पुरेसे संख्याबळ नाही आणि सरकार पाडण्याच्या प्रयत्नांबाबतचे वृत्त केवळ माध्यमांमधील तर्कवितर्क आहेत. एआयएडीएमके नेत्याच्या मते, वाढती महागाई, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, औद्योगिक विकासाच्या गैरव्यवस्थापनामुळे उद्योगांचे शेजारील राज्यांत होणारे स्थलांतर आणि मेकेदातू प्रकल्पाबाबत ठोस पावले उचलण्यात आलेले अपयश अशा विविध समस्यांमुळे टीव्हीके सरकार स्वतःहून कोसळू शकते. माजी मुख्यमंत्र्यांनी आरोप केलाय की, कर्नाटककडून राज्याला मिळणारा पाण्याचा वाटा मिळवून देण्यात तामिळनाडू सरकार अपयशी ठरलंय.

विशेष म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारने दाखल केलेल्या दोन याचिका फेटाळून लावल्या आहेत. या याचिकांमध्ये कर्नाटकला कावेरी नदीतून ११,००० दशलक्ष घनफूट (टीएमसी) पाणी सोडण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली होती. यानंतर काही वेळातच विरोधी पक्ष नेते द्रविड मुनेत्र कझगमचे अध्यक्ष एमके स्टॉलिन यांनी मुख्यमंत्री विजय यांनी विनंती केली की, त्यांनी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना वाचवावं. यासह या विषयावर ठराव मंजूर करण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी त्वरित सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (X) वरील एका सविस्तर पोस्टमध्ये स्टॅलिन यांनी म्हटले आहे की, मेट्टूर धरणातील पाणी उपलब्ध नसल्यामुळे आणि पाणीपातळी कमी झालीय. यामुळे सिंचनासाठी पाणी सोडणे शक्य झाले नाही, परिणामी शेतीचे आधीच मोठे नुकसान झाले आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे आणि कर्नाटकात सिंचनासाठी कावेरीच्या पाण्यातील न्याय्य वाटा न सोडल्यामुळे, उभी पिकेही सुकू लागली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: साम टीव्ही इम्पॅक्ट! जिवंत शेतकऱ्याला कागदोपत्री मृत दाखवणारी चूक अखेर दुरुस्त

धावपटूचा पाण्यात बुडून मृत्यू; सरावानंतर पोहण्यासाठी गेला अन् काळाचा घाला, क्रीडाक्षेत्रात शोककळा

Blood Pressure : सकाळ की संध्याकाळ? ब्लड प्रेशर नेमका कधी वाढतो? शरीरातच लपलंय हे चक्र, माहिती असायला हवं

Chanakya Niti : कामापुरता मामा म्हणणाऱ्या ५ प्रकारच्या लोकांपासून राहा सावध! चाणक्यांनी सांगितली ओळख

Kaaliya Movie: कार्तिक आर्यनचा वाढदिवशी चाहत्यांना मोठ सरप्राईज! 'कालिया'चा थरारक टीझर रिलीज, श्रीकृष्ण कथेतून उलगडणार रहस्य

SCROLL FOR NEXT