1 gram gold ring scheme for newborns in government hospitals saam tv
देश विदेश

मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! नवजात बाळांना देणार सोन्याची अंगठी; १,२८,४९९ अंगठ्यांची ऑर्डर

Tamil Nadu Government Gold Ring Scheme For Newborn Babies 2026: तमिळनाडू सरकारने नवजात बालकांसाठी मोठा निर्णय घेतला असून थाई मामन सुवर्ण अंगठी योजनेसाठी 1 लाख 28 हजार 499 सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिली आहे. योजना 15 सप्टेंबर 2026 पासून सुरू होणार आहे.

Omkar Sonawane

तमिळनाडू सरकारने नवजात बालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या थाई मामन सुवर्ण अंगठी योजना’ अंतर्गत सोन्याच्या अंगठ्या खरेदी करण्यासाठी जॉय अलुक्कास आणि कल्याण ज्वेलर्स या दोन सोन्याच्या कंपन्यांना काम दिले आहेत. माजी मुख्यमंत्री सी. एन. अण्णादुराई यांच्या जयंतीनिमित्त 15 सप्टेंबर रोजी या योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, तमिळनाडू मेडिकल सर्व्हिसेस कॉर्पोरेशनने (TNMSC) जून ते सप्टेंबर या कालावधीतील लाभार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या 1 लाख 28 हजार 499 सोन्याच्या अंगठ्यांच्या पुरवठ्यासाठी जॉय अलुक्कास आणि कल्याण ज्वेलर्स यांना अनुक्रमे 70:30 या प्रमाणात कार्यादेश दिले आहेत.

मुख्यमंत्री विजय थलपथी यांनी निवडणुकीपूर्वी केली होती घोषणा

मुख्यमंत्री विजय थलपथी यांनी एप्रिलमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सुरू करणार असल्याचे आश्वासन दिले होते. याची पूर्तता त्यांनी आज केली असून सरकारी रुग्णालयांमध्ये जन्मलेल्या नवजात बालकांना या योजनेचा लाभ मिळणार असून, सरकारी वैद्यकीय संस्थांमध्ये प्रसूतीला प्रोत्साहन देणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. सरकारच्या निवेदनानुसार, प्रत्येकी एक ग्रॅम वजनाच्या तब्बल 4 लाख 41 हजार 667 सोन्याच्या अंगठ्या उपलब्ध करून देण्यासंदर्भात सरकारने प्रसिद्ध पत्रक काढले होते. त्यानंतर 14 जुलै रोजी TNMSC ने निविदा प्रक्रिया सुरू केली होती. या निविदेत 11 कंपन्यांनी सहभाग घेतला आणि टीएन टेंडर्स पोर्टलद्वारे आपल्या दरांचा तपशील सादर केला.

जॉय अलुक्कासची सर्वात कमी बोली

जॉय अलुक्कासने एक ग्रॅम सोन्याच्या किमतीव्यतिरिक्त प्रक्रिया शुल्क, विमा, वाहतूक आणि भारतीय मानक ब्युरोच्या (BIS) हॉलमार्किंगसह इतर सर्व अतिरिक्त शुल्कांसाठी केवळ 0.01 रुपयांची सर्वात कमी बोली लावली होती. तमिळनाडूच्या संबंधित निविदा नियमांनुसार कल्याण ज्वेलर्सनेही सर्वात कमी दराची बोली सादर केली. ही योजना 15 सप्टेंबर 2026 रोजी सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे जूनपासूनच्या चार महिन्यांतील लाभार्थ्यांना 1 लाख 28 हजार 499 सोन्याच्या अंगठ्या उपलब्ध करून देण्यासाठी दोन्ही कंपन्यांना 70:30 या प्रमाणात कार्यादेश देण्यात आले आहेत. 22 जून 2026 पासून सरकारी रुग्णालयांमध्ये जन्मलेल्या बालकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paper Dosa Recipe : घरच्या घरी कुरकुरीत पेपर डोसा असा करा तयार; रेस्टॉरंटची चव विसराल!

Maharashtra News Live Update: चार वर्षात 17 हून अधिक मैदानं निवासी किंवा कर्मशिअल करण्यात आली - आदित्य ठाकरे

Kaju Benefits: रोज ४ काजू खाल्ल्याने काय होते? जाणून घ्या शरीराला मिळणारे जबरदस्त ७ फायदे

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी खेळला मोठा राजकीय डाव; भाजपच्या बड्या नेत्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

Monday Horoscope : मानसिक ताण जाणवेल, शंकराच्या कृपेने अडथळे दूर होतील; वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT