Tamil Nadu Government Announces 15 Days Paternity Leave For Male Employees saam tv
देश विदेश

आता पुरुषांनाही मिळणार १५ दिवसांची पॅटरनिटी लिव्ह! मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

Paternity Leave For Male Government Employees : तमिळनाडू सरकारने पुरुष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी १५ दिवसांची पितृत्व रजा देण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे बाळाच्या जन्मानंतर वडिलांनाही पत्नी आणि नवजात बाळासोबत वेळ घालवता येणार आहे.

Bharat Jadhav

  • तमिळनाडू सरकारकडून पुरुष कर्मचाऱ्यांना १५ दिवसांची पितृत्व रजा

  • मुख्यमंत्री विजय यांचा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय

  • बाळाच्या जन्मानंतर वडिलांना १५ दिवसांची सुट्टी मिळणार

सी.जोसेफ विजय यांनी जेव्हापासून तमिळनाडू राज्याची धुरा हाती घेतलीय, तेव्हापासून ते एकापाठोपाठ एक असे धडाकेबाज निर्णय घेत आहेत. आज मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलाय. हा निर्णय आहे, पॅटरनिटी लिव्ह (पालकत्वाच्या सुट्टीचा) हो, आता पुरुषांनाही पॅटरनिटी लिव्ह म्हणजेच पितृत्व रजा मिळणार आहे, तेही तब्बल १५ दिवसांची. पितृत्वच्या सु्ट्टीचा निर्णय घेतल्यानं राज्य सरकारमध्ये कार्यरत असलेल्या विवाहित पुरुष कर्मचाऱ्यांना त्यांच्या अपत्याच्या जन्माच्या वेळी १५ दिवसांची रजा घेण्याचा अधिकार असणार आहे.

बाळाच्या आईला शारिरिक आणि मानसीक आधार देण्यासह मुलाची काळजी घेणं ही वडिलांचीही मोठी भागीदारी असते. त्यामुळे तमिळनाडू सरकारनं पुरुष कर्मचाऱ्यांनाही १५ दिवसाची पॅटरनिटी लिव्ह देण्याचा निर्णय पारीत केलाय. जेणेकरून कर्मचारी आपल्या पत्नीच्या मॅटरनिटी लिव्हमध्ये त्यांच्यासोबत राहू शकतील.

तमिळनाडू राज्यात महिला कर्मचाऱ्यांना आता ३६५ दिवसाची मॅटरनिटी लिव्ह दिली जाते. त्यामुळे पुरुष कर्मचाऱ्यांना पॅटरनिटी लिव्ह देण्यात यावी अशी मागणी केली जात होती. या मागणीचा विचार करून सरकारनं १५ दिवसांची पॅटरनिटी लीव्ह देण्याचा निर्णय घेतलाय. बाळाचा जन्म होतो तो काळ आई-वडिलांसाठी खूप महत्त्वाचा असतो. त्याकाळात पत्नीला मानसीक आधार देण्यासह नवजात शिशुची काळजी घेण्यासाठी पिताची भागादारी आवश्यक असते.

पुरुषांना ही १५ दिवसांची सुट्टी बाळंतपणाआधी किंवा प्रसुतीनंतर घेता येणार आहे. म्हणजेच बाळाचा जन्म झाल्यानंतर ६ महिन्याच्या आत सुट्टी घेता येईल. सरकारच्या या सु्ट्टीच्या निर्णयामुळे नागरिकांना कौटुंबिक जबाबदारी वाटून घेण्यास मदत मिळेल आणि बाळाचं पालन-पोषण देखील चांगल्या प्रकारे होईल.

Maharashtra News Live Update: बारामतीत थार चालकाची मुजोरी! वाहतूक पोलिसाला धडक देऊन चालक फरार

Baby Care : लहान बाळांच्या डोळ्यांना काजळ लावणे योग्य की अयोग्य? डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

Supreme Court : पाकिटबंद खाद्यपदार्थाबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश, पाकिटावर येणार वेगवेगळे वॉर्निंग लेबल

Kidney Damage Causes: किडनीला हळूहळू खराब करतात या रोजच्या ७ सवयी; आजच करा बदल, अन्यथा वाढू शकतो धोका

Government Employees : सर्वसामान्यांची कामे रखडवली तर सरकारी कर्मचाऱ्यांना २५ हजारांचा दंड, सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT