काबुल, अफगाणिस्तान: तालिबानने अफगाणिस्ताचा ताबा घेतल्यानंतर आता तालिबानी सरकार अफगाणी महिलांवर निर्बंध कठोर करत आहे. तालिबानने (Taliban) एक नवा फर्मान जाहिर केलाय. यानुसार अफगाणी महिलांना आता सार्वजनिक ठिकाणी वावरताना चेहरा झाकावा लागणार आहे. महिलांनी (Womens) चेहरा झाकण्यासाठी बुरखा (Burkha) वापरणं सक्तीचं केलं आहे. जर कुणी या फतव्याचं (Order) उल्लंघन केलं तर त्या महिलेल्या वडिलांना, पतीला किंवा जवळच्या पुरुषाला सरकारी नोकरीतून काढलं जाऊ शकतं. याशिवाय महिलेशी संबंधित पुरुषाला आर्थिक दंडासह तुरुंगाची शिक्षाही होऊ शकते. (Taliban announce women must cover faces in public, say burqa is best)
हे देखील पाहा -
रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, तालिबान सत्तेत आल्यापासून अफगाणिस्तानात (Afghanistan) सार्वजनिक ठिकाणी महिलांवरील निर्बंध वाढत आहेत आणि अशा निर्णयांवर अनेक अफगाण लोकांकडून आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने तालिबानवर टीका केली आहे. काबूलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत, धर्माचा प्रचार आणि दुष्टता प्रतिबंध विभागाच्या प्रवक्त्याने, तालिबानचा सर्वोच्च नेता हिबतुल्ला अखुंदजादा यांचा हा हुकूम वाचून दाखवला.
इतकंच नाही, तर या आदेशात असेही म्हटले आहे की, जर एखाद्या महिलेने घरातून बाहेर पडताना चेहरा झाकला नाही, तर तिच्या वडिलांना किंवा जवळच्या पुरुष नातेवाईकाला सरकारी नोकरीतून काढून टाकले जाऊ शकते आणि शेवटी तिलाही नोकरीतून काढून टाकले जाऊ शकते आणि तुरुंगात पाठवले जाऊ शकते. तालिबानच्या आदेशानुसार चेहरा झाकणारा सर्वात आदर्श पोशाख निळा बुरखा मानला जातो.
१९९६ आणि २००१ च्या दरम्यान, जेव्हा अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे राज्य होते, तेव्हाही हा निळा बुरखा प्रचलित होता आणि जगभरातील अनेक लोकांनी याला तालिबान राजवटीच्या जागतिक ओळखीचा दुवा म्हणून पाहिले. अफगाणिस्तानातील अनेक स्त्रिया धार्मिक कारणास्तव डोक्यावर स्कार्फ घालतात, परंतु काबूलसारख्या शहरी भागात अनेक स्त्रिया त्यांचे चेहरे झाकत नाहीत. मात्र तालिबानच्या फर्मानमुळे आता अफगाणी स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर आणि मुलभूत हक्कांवर गदा आणली गेली आहे. तालीबानी राजवटीत स्त्रियांवरील निर्बंधांबाबत जगभरातून टीका होत आहे.
Edited By - Akshay Baisane
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.