Afganistan Conflict : तालिबान्यांचा कंधार विमानतळावर रॉकेट हल्ला Twitter/@SarFaraj1201
देश विदेश

Afganistan Conflict : तालिबान्यांचा कंधार विमानतळावर रॉकेट हल्ला

तालिबानच्या हल्ल्यात अफगाणिस्तानातील निष्पाप लोक बळी ठरत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था

कंधार: अमेरिकेने अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेतल्यानंतर तालिबान पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. तालिबानने काल रात्रीच्या सुमारास अफगाणिस्तानच्या कंधार विमानतळावर रॉकेट हल्ले केले आहेत. विमानतळ अधिकाऱ्यांकडून ही माहिती मिळाली आहे. विमानतळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण अफगाणिस्तानातील कंधार विमानतळावर रात्री उशिरा झालेल्या तीन रॉकेट हल्ले झाले. (Afghanistan Conflict: Taliban rocket attack on Kandahar airport)

तालिबानने अफगाणिस्तानचा मोठा भाग काबीज करण्याची मोहीम आखली असून असे हल्ले करुन ती अधिक तीव्र करण्याचे काम सुरु आहे. तर अफगाणी सैन्यदेखील तालिबान्याच्या या कारवायांना सडेतोड प्रत्युत्तर देत आहे. तालिबान्यांनी हल्ले केल्यानंतर अफगाणी सैन्य आणि तालिबानी हल्लेखोरांमध्ये अनेक चकमकी पाहायला मिळत आहेत. त्याचवेळी कंधार विमानतळाचे प्रमुख मसूद पश्तून यांच्या म्हणण्यानुसार, विमानतळावर तीन रॉकेट डागण्यात आले आणि त्यातील दोन धावपट्टीवर आदळले. यामुळे विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तालिबानच्या हल्लेखोरांनी हेरात, लष्कर गाह आणि कंधारला घेरल्यापासून हे हल्ले होत आहेत. अमेरिकी सैन्याने वापसीची घोषणा केल्यानंतर तालिबानने देशातील ग्रामीण भागात आपले पाय रोवायला सुरुवात केली आहे.

दरम्यान, अफगाण सुरक्षा दलांने दिलेल्या माहितीनुसार, काल हेलमंड प्रांतातील लष्करगाह येथे केलेल्या लष्करी कारवाईत तालिबानच्या दोन प्रमुख कमांडरसह 51 अतिरेकी मारले गेले. याच कारवाईत 40 तालिबानी दहशतवादी जखमी झाल्याची पुष्टी झाली आहे.तथापि, कंधार अजूनही अफगाणिस्तान सरकारच्या ताब्यात आहे, पण तालिबान झपाट्याने ते काबीज करण्याचा प्रयत्न करत आहे. कंधार हे अफगाणिस्तानातील महत्त्वाचे शहर आहे. गेल्या काही दिवसांपासून तालिबानने येथे हल्ले तीव्र केले आहेत. रॉकेट हल्ले होत आहेत. निष्पाप लोकांना मारले जात आहे. परिस्थिती अशी आहे की लोकांना आपली घरे सोडून निर्वासित छावण्यांमध्ये राहावे लागत आहे.

सरकारने कंधारमध्ये निर्वासित छावणी उभारली आहे, ज्यात 11 हजारांहून अधिक कुटुंबे राहत आहेत. कंधारचे खासदार सय्यद अहमद सैलाब यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, ईदनंतर तालिबानने अफगाण सैन्यावर हल्ले तीव्र केले. कंधारमधील सर्वसामान्य लोक तालिबान आणि लष्कर यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात अडकले आहेत आणि परिस्थिती अशी आहे की शेकडो गावांतील हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणांच्या शोधात घर सोडून पळून जाण्यास भाग पाडले गेले आहे.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बुलढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

साताऱ्यात दहीहंडीचा जल्लोष! Udayanraje Bhosale यांनी उडवली हटके स्टाईल कॉलर, पाहा व्हिडीओ

Ladki Sunbai Yojana: लाडकी बहीणनंतर लाडकी सुनबाई योजना! उपमुख्यमंत्र्यांनी केला शुभारंभ; नक्की आहे तरी काय?

भाविकांचा टॅक्टर महादेव डोंगराच्या दरीत कोसळला, २ महिलांचा जागीच मृत्यू, २४ जखमी

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाचा कहर, मुंबईसह राज्यात कोसळधारा, वाचा आज कोणत्या भागात IMD चा कोणता अलर्ट

SCROLL FOR NEXT