Security forces intensify search operations after drones and firing reported near Uri LOC in Jammu & Kashmir. File photo social media
देश विदेश

Uri : आदल्या रात्री डझनभर ड्रोन, दुपारी घुसखोरीचा प्रयत्न आणि गोळीबार; जम्मू-काश्मीरमध्ये जवानांनी उधळला मोठा डाव

suspicious movements Uri : जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ संशयास्पद हालचाली आणि गोळीबाराच्या घटनेनंतर भारतीय जवानांनी शोधमोहीम तीव्र केली. याआधीच पूंछ जिल्ह्यात पाकिस्तानकडून जवळपास डझनभर ड्रोन घिरट्या घालताना दिसून आले होते.

Nandkumar Joshi

  • उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ संशयास्पद हालचाली

  • लष्कराच्या जवानांनी तातडीने हाती घेतली शोधमोहीम

  • आदल्या रात्री पूंछमध्ये डझनभर ड्रोनच्या घिरट्या

जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात काल रात्रीच्या सुमारास पाकिस्तानकडून जवळपास डझनभर ड्रोन घिरट्या घालताना दिसल्यानंतर, आज, सोमवारी दुपारी उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ काही संशयास्पद हालचाली आणि गोळीबार झाल्याची घटना घडली. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी शोधमोहीम अधिक तीव्र केली.

जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये एलओसी अर्थात नियंत्रण रेषेजवळ काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या. तसेच बेछूट गोळीबारही करण्यात आला, अशी माहिती भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली. सुरक्षा दलाच्या जवानांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली आहे, असे वृत्त एएनआयने दिले.

नियंत्रण रेषेजवळ डझनभर ड्रोन घालत होते घिरट्या

जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ आदल्या रात्री म्हणजेच रविवारी रात्री पाकिस्तानकडून डझनभर ड्रोन आकाशात घिरट्या घालताना दिसून आले होते. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी परिसरात शोध मोहीम तीव्र केली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, डझनभर ड्रोन अवकाशात घिरट्या घालत होते. ते उंचावर होते. अवघ्या पाच मिनिटांतच ते सर्व ड्रोन पाकिस्तानच्या दिशेने परत गेले. टेहाळणीसाठी हे ड्रोन पाठवले असावेत, असा दाट संशय व्यक्त केला जात आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, गेल्याच महिन्यात काश्मीरच्या उत्तरेकडील बारामुल्ला जिल्ह्यातील उरीमधील चुरुंदा परिसरात लष्कराच्या जवानांनी घुसखोरीचा डाव उधळून लावला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Spruha Joshi Photos: स्पृहाचं तेजस्वी रूप, हे फोटो पाहून तुम्हीही व्हाल फिदा

राज ठाकरेंनी फटकारल्यानंतर 'पिट्या भाई' दुसरीकडेच फिरले; रमेश परदेशींचा भाजपमध्ये प्रवेश

Crime: पप्पा मला सोडा..., फावडा डोक्यात टाकत मुलाला संपवलं; सुनेच्या प्रेमात वेडा झालेल्या सासऱ्याचं भयंकर कृत्य

कोल्हापुरात राजकारण फिरलं, हसन मुश्रीफ-समरजीत सिंह घाटगेंची युती; कट्टर विरोधक एकत्र कसे आले? VIDEO

Delhi Blast: मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अल-फलाहच्या संस्थापकाला अटक; दिल्ली बॉम्बस्फोटांनंतरची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT