Sansad Ratna Award 2022 Latest News  Saam TV
देश विदेश

Sansad Ratna Award 2022: सुप्रिया सुळेंसह श्रीरंग बारणे आणि इतर 9 खासदारांना संसदरत्न पुरस्कार जाहीर...

Sansad Ratna Award 2022: 11 खासदारांमध्ये लोकसभेतील आठ आणि राज्यसभेतील तीन सदस्यांचा समावेश आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे, क्रांतिकारी समाजवादी पक्षाचे (RSP) खासदार एन. के. प्रेमचंद्रन आणि शिवसेना खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना त्यांच्या सातत्यपूर्ण तथा उत्कृष्ट कामगिरीसाठी ‘संसद विशिष्ट रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली: संसदीय कामकाजात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सदस्यांना (खासदारांना) संसदरत्न पुरस्कार दिला जातो. यंदाच्या वर्षी संसदरत्न पुरस्कार 2022 साठी निवडलेल्या 11 खासदारांमध्ये राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि बीजेडीचे अमर पटनायक (Amar Patnaik) यांचा समावेश आहे, असे प्राइम पॉइंट फाऊंडेशनने मंगळवारी सांगितले. तसेच ज्युरी समितीने तमिळनाडूतील भाजपचे ज्येष्ठ नेते एच. व्ही. हांडे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एम वीरप्पा मोईली यांना जीवनगौरव पुरस्कारासाठी नामांकित केले आहे, तर चार संसदीय स्थायी समित्या – कृषी, वित्त, शिक्षण आणि कामगार त्यांच्या योगदानाबद्दल पुरस्कार प्रदान केले जातील. (Supriya Sule, Shrirang Barne and 9 other MPs announced Parliamentary Award ...)

हे देखील पहा -

11 खासदारांमध्ये लोकसभेतील आठ आणि राज्यसभेतील तीन सदस्यांचा समावेश आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे, क्रांतिकारी समाजवादी पक्षाचे (RSP) खासदार एन. के. प्रेमचंद्रन आणि शिवसेना खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना त्यांच्या सातत्यपूर्ण तथा उत्कृष्ट कामगिरीसाठी ‘संसद विशिष्ट रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सोबतच तृणमूल काँग्रेसच्या खासदार सौगता रॉय (पश्चिम बंगाल), काँग्रेसचे खासदार कुलदीप राय शर्मा (अंदमान आणि निकोबार बेट), भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार विद्युत बरन महतो (झारखंड), हीना विजयकुमार गावित (महाराष्ट्र) आणि सुधीर गुप्ता (मध्य प्रदेश) या खासदारांना 17 व्या लोकसभेतील कामगिरीबद्दल त्यांची संसदरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

संसदेच्या वरच्या/ वरिष्ठ सभागृहात, बिजू जनता दलाचे (BJD) खासदार अमर पटनायक (ओडिशा) आणि राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया तहसीन अहमद खान (महाराष्ट्र) यांना 2021 मध्ये सिटींग सदस्य (Sitting Members) श्रेणी अंतर्गत त्यांच्या कामगिरीसाठी निवडण्यात आले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) खासदार के. के. रागेश (केरळ) यांना राज्यसभेतील त्यांच्या पूर्ण कार्यकाळात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल २०२१ मध्ये 'निवृत्त सदस्य’ श्रेणी अंतर्गत पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे.

प्राईम पॉइंट फाऊंडेशनचे (Prime Point Foundation) संस्थापक अध्यक्ष के श्रीनिवासन यांनी सांगितले की, PRS इंडियाने दिलेल्या डेटाच्या आधारे 17 व्या लोकसभेच्या सुरुवातीपासून हिवाळी अधिवेशन 2021 च्या शेवटपर्यंतच्या त्यांच्या एकत्रित कामगिरीच्या आधारे पुरस्कारासाठी विजेत्यांची निवड करण्यात आली. संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या अध्यक्षतेखाली संसद रत्न पुरस्कार समिती नेमण्यात आली. यात भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एस. कृष्णमूर्ती सह-अध्यक्ष होते. भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत एपीजे अब्दुल कलाम यांच्या सूचनेनुसार उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संसद सदस्यांचा सन्मान करण्यासाठी या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली होती.

पहिला पुरस्कार सोहळा 2010 मध्ये चेन्नई येथे आयोजित करण्यात आला होता आणि तत्कालीन राष्ट्रपती कलाम यांनी स्वतः या उपक्रमाची सुरुवात केली होती. फाऊंडेशनच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत 75 सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या संसद सदस्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT