Supreme Court Article 370 Saam TV
देश विदेश

Article 370: जम्मू-काश्मीरला पुन्हा विशेष राज्याचा दर्जा मिळणार? आज ऐतिहासिक फैसला, कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष

Supreme Court Article 370: जम्मू काश्मीरला पुन्हा विशेष राज्याचा दर्जा मिळणार, की केंद्र सरकारने घेतलेला कलम ३७० हटवण्याचा निर्णय कायम राहणार? यावर आज सुप्रीम कोर्ट ऐतिहासिक निकाल देणार आहे.

Satish Daud

Supreme Court Judgment on Jammu and Kashmir Article 370

जम्मू काश्मीरला पुन्हा विशेष राज्याचा दर्जा मिळणार, की केंद्र सरकारने घेतलेला कलम ३७० हटवण्याचा निर्णय कायम राहणार? यावर आज सुप्रीम कोर्ट ऐतिहासिक निकाल देणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर अपलोड केलेल्या यादीनुसार, ११ डिसेंबर (सोमवार) रोजी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील ५ न्यायाधीशांचे घटनापीठ हा निकाल देणार आहे. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

५ ऑगस्ट २०१९ रोजी केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे घटनेतील कलम 370 रद्द केलं होतं. त्यानंतर राज्याचे जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आलं. केंद्राच्या या निर्णयाविरोधात अनेकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. (Latest Marathi News)

कलम ३७० हटवण्यावर आक्षेप घेत सुप्रीम कोर्टात अनेक हस्तक्षेप याचिका दाखल झाल्या. या याचिकांवर सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या ५ सदस्यीय खंडपीठाने सुनावणी घेतली.

सुनावणी दरम्यान, कोर्टाने (Supreme Court) कलम ३७० रद्द करण्याचा बचाव करणार्‍यांचा युक्तिवाद ऐकला. केंद्रातर्फे अॅटर्नी जनरल आर वेंकटरामानी, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, ज्येष्ठ वकील हरीश साळवे, राकेश द्विवेदी, व्ही गिरी आणि इतरांनी बाजू मांडली.

तर कपिल सिब्बल, गोपाल सुब्रमण्यम, राजीव धवन, जफर शाह, दुष्यंत दवे आणि इतर ज्येष्ठ वकिलांनी याचिकाकर्त्यांच्या वतीने जोरदार युक्तिवाद केला. तब्बल १६ दिवस सुरू असलेल्या या सुनावणीवर कोर्टाने सरकारी आणि विरोधी पक्षाची बाजू ऐकून घेतली.

५ सप्टेंबरला सुनावणी पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने या प्रकरणाचा निर्णय राखून ठेवला होता. आज यावर सुप्रीम कोर्ट ऐतिहासिक निकाल देणार आहे. त्यामुळे या निकालाकडे केंद्र सरकारसह संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT