Supreme Court Saam TV
देश विदेश

Supreme Court : मृतदेहांची अदलाबदली, कर्नलच्या कुटुंबीयांना दिला दुसऱ्या व्यक्तीचा मृतदेह; कोर्टाने रुग्णालयाला ठोठावला २५ लाखांचा दंड

Supreme Court Verdict On Dead Body Exchange : केरळच्या एर्नाकुलम रुग्णालयात 2009 च्या अखेरीला मृतदेहांची अदलाबदली झाली होती. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने रुग्णालयाला २५ लाखांचा दंड ठोठावला आहे.

Sandeep Gawade

केरळच्या एर्नाकुलम रुग्णालयात 2009 च्या अखेरीला एक धक्कादायक घटना घडली होती. या घटनेतील निष्काळजीपणाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने रुग्णालयाला तब्बल २५ लाखांचा दंड ठोठावला आहे. एर्नाकुलम रुग्णालयाने याचिकाकर्त्या मूलाच्या वडिलांचा मृतदेह दुसऱ्या कोणालातरी दिला होता, त्यामुळे त्यांच्या वडिलांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही करता आले नव्हते. याप्रकरणी न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने रुग्णालयाला ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत सेवेतील निष्काळजीपणाबद्दल रुग्णालयाचाला दोषी ठरलं आहे.

खंडपीठाने राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाचा आदेश रद्द केला आहे. ज्यामध्ये अपीलकर्ता मेसर्स एर्नाकुलम मेडिकल सेंटर आणि इतरांना नुकसान भरपाईची रक्कम तक्रारदार डॉ. पी.आर. जयश्री आणि इतरांना फक्त पाच लाख रुपये देण्याचे आदेश दिले होते. तर राज्य ग्राहक आयोगाच्या ग्राहक कायदेशीर मदत खात्यात 25 लाख रुपये जमा करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या प्रकारेच आदेश देण्याचं कारण नव्हतं कारण रुग्णालयाने सेवेत निष्काळजीपणा केला आहे. रुग्णालयाने याचिकाकर्त्याच्या वडिलांचा मृतदेह दुसऱ्या कुटुंबाकडे सुपूर्द केला, त्यांनी त्यांचे अंतिम संस्कारही केले. अशा स्थितीत रुग्णालय आपली जबाबदारी टाळू शकत नाही, त्यामुळे रुग्णालयाने याचिकाकर्त्याला 25 लाख रुपये भरपाई द्यावी, असा आदेश न्यायालयाने दिला.

नेमकं प्रकरण काय आहे

लेफ्टनंट कर्नल ए. पी. कैंथी यांना 28 डिसेंबर 2009 रोजी केरळमधील एर्नाकुलम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर दोन दिवसांनी 30 डिसेंबर 2009 रोजी तक्रारदारांचे वडील आर. पुरुषोत्तमन यांनाही याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 30 डिसेंबर 2009 रोजी रात्री त्यांचं निधन झालं. कुटुंबीयांनी मृतदेह रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्याची विनंती केली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ए. पी. कैंथी यांचंही निधन झालं. त्यांचाही मृतदेह शवागारात ठेवण्यात आला होता.

मात्र दुसऱ्याच दिवशी काही वेगळचं घडलं. पुरुषोत्तमन यांचा मृतदेह कर्नल ए. पी. कैंथी यांच्या कुटुंबीयांना देण्यात आला आणि त्यांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कारही केले. यानंतर 1 जानेवारी 2010 रोजी पुरुषोत्तमन (तक्रारदारांचे वडील) यांचे कुटुंबीय मृतदेह घेण्यासाठी आले होते. मात्र त्यांना जो मृतदेह देण्यात आला तो पाहून त्यांना धक्काच बसला. तो मृतदेह कर्नल कैंथी यांचा होता. कुटुंबीयांनी याची रुग्णालय प्रशासनाकडे विचारणा केली असता त्याच्या वडिलांचा मृतदेह चुकून कैंथी यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आल्याचं उघड झालं होतं. त्यावर त्यांनी अंत्यसंस्कारही केले होते. त्यानंतर पुरुषोत्तम यांचा कुटुंबीयांनी राष्ट्रीय ग्राहक मंचाकडे धाव घेतली होती. ग्राहक मंचाचाचा हा आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने रद्द करत रुग्णालयाला २५ लाखांचा दंड ठोठावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rent Or Buy Home: रेंटवर राहावं की EMI वर घर खरेदी करावे? हक्काचं घर खरेदी करण्याआधी गणित समजून घ्या

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

SCROLL FOR NEXT