Supreme Court Decision Saam Tv
देश विदेश

Supreme Court : नवरा-बायकोच्या खासगी कॉल रेकॉर्डिंगचा पुरावा ग्राह्य धरला जाणार; सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

Supreme Court Decision : सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की, पती-पत्नीमधील गुप्त कॉल रेकॉर्डिंग हे वैवाहिक प्रकरणात पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाऊ शकते.

Alisha Khedekar

पती पत्नीच्या एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वैवाहिक प्रकरणात नवरा बायकोचे खाजगी कॉल रेकॉर्डिंग पुराव्यासाठी ग्राह्य धरले जाऊ शकते.असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. विशेष म्हणजे न्यायालयाने संमतीशिवाय कॉल रेकॉर्ड करणे हे गोपनीयतेचे उल्लंघन आहे. हा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा आदेशही रद्द केला आहे.

न्यायमूर्ती बी व्ही नागरत्न आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरु होती. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी म्हटले आहे की, "काही युक्तिवाद असे देण्यात आले होते की, असे पुरावे स्वीकारल्याने घरगुती सुसंवाद आणि वैवाहिक संबंधावर परिणाम होईल आणि त्यामुळे पती पत्नीमधील हेरगिरीला चालना मिळेल. अशा परिस्थितीत पुरावा कायद्याच्या कलम १२२च्या मूळ उद्देशाचे उल्लंघन होते.

खंडपीठाने असे म्हटले आहे की,"हा युक्तिवाद वैध नाही. जर लग्न अशा टप्प्यावर पोहचलं असेल की पती पत्नी एकमेकांवर संशय घेत हेरगिरी करत असतील तर, हे तुटलेल्या नात्याचे लक्षण आहे. आणि हे लक्षण दोघांमध्ये विश्वासाचा अभाव असल्याचे दर्शवते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Update : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? सर्वोच्च सुनावणीला सुरूवात

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला छावा संघटनेचा पाठिंबा

Diabetes and Modak: डायबिटीजचे रूग्ण मोदक खाऊ शकतात का? जाणून घ्या

SET Exam 2026: महत्वाची बातमी! सेटची परीक्षा तिसऱ्यांदा पुढे ढकलली, सप्टेंबरमध्ये 'या' दिवशी असेल पेपर

पिंपरी-चिंचवड पोलिसांचा मोठा निर्णय, इतक्या दिवस मनाई आदेश लागू; अटी कोणत्या?

SCROLL FOR NEXT