SUPREME COURT ON CJP PROTEST: CJI SURYA KANT DECLINES HEARING ON DELHI LATHICHARGE PETITION Saam tv
देश विदेश

आमचा वेळ वाया घालवू नका; विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईविरोधात दाखल याचिकेवर सरन्यायाधीशांची टिप्पणी

Supreme Court On Protest Lathicharge: दिल्लीतील जंतर-मंतर येथे सीजेपी (CJP) आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीमाराबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. यावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी या प्रकरणावर सुनावणी करण्यास नकार दिलाय.

Bharat Jadhav

  • याचिका NEET पेपरफुटीमुळे प्रभावित विद्यार्थ्यांशी संबंधित असल्याचा दावा

  • सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी या प्रकरणात न्यायालयाला रस नसल्याचे म्हटल्याचे वृत्त आहे.

  • कथित लाठीचार्जचा व्हिडिओ पाहण्यासही न्यायालयाने नकार दिल्याचे सांगितले जात आहे.

दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलनावेळी पोलिसांनी लाठीचार्जे केला. या प्रकरणावरून देशातील राजकारण तापलंय. त्याचदरम्या सुप्रीम कोर्टात लाठीचार्जबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश यांनी एक टिप्पणी केली आहे. त्यावरून आता नवीन वाद होण्याची शक्यता आहे.

कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जबाबतची याचिका बुधवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. या प्रकरणावर सुनावणी करताना सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी न्यायालयाला या प्रकरणात कोणताही रस नसल्याचं म्हटलंय.

हे प्रकरण NEET पेपरफुटीमुळे बाधित झालेल्या विद्यार्थ्यांशी संबंधित असल्याचं वकील नरेंद्र मिश्रा यांनी सांगितलं. परंतु सरन्यायाधीश सूर्यकांत यांना याचिकेवर सुनावणी घेतलीच नाहीये. यासह लाठीचार्जचा व्हिडिओ पाहण्यासही त्यांनी नकार दिला. सरन्यायाधीशांनी आमच्याकडे वेळ नसल्याचं वकील नरेंद्र मिश्रा यांना सांगितले.

आमचा आणि तुमचा वेळ वाया घालवू नका- सुप्रीम कोर्ट

सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी वकील नरेंद्र कुमार मिश्रा यांना स्वतःचा आणि न्यायालयाचा वेळ वाया न घालवण्यास सांगितलं वकील मिश्रा यांनी नमूद केलं की, विद्यार्थी NEET परीक्षेचे योग्य आयोजन आणि NTA मधील सुधारणांची गरज यांसारखे महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करत आहेत. त्यावेळी वकिलांचे बोलणे मध्येच थांबवत सरन्यायाधीश म्हणाले, "तुमचे खूप खूप आभार."

पोलिसांच्या अतिरेकी वर्तनाचे चित्रण करणारे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ते आली आहेत, अशी माहिती वकिलांनी सरन्यायाधीशांना दिली असता त्या व्हिडिओमध्ये कोणताही रस नाही आणि ते पाहण्यासाठी त्यांच्याकडे वेळही नाही, अशी सरन्यायाधीशांनी टिप्पणी केली. विशेष म्हणजे दिल्ली उच्च न्यायालयानेही मंगळवारी अशाच एका प्रकरणात तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला होता आणि न्यायालयाने या प्रकरणात ओढले जाऊ नये, असे निरीक्षण नोंदवले होते.

उच्च न्यायालयात दोन याचिका

दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत दिल्ली उच्च न्यायालयात दोन जनहित याचिका (PILs) दाखल करण्यात आल्या आहेत. हे प्रकरण तातडीने सुनावणीसाठी घेण्यासाठी बुधवारी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या खंडपीठासमोर मांडण्यात आले. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितले की, या घटनेने देशाला हादरवून सोडलंय.

दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन

देशभरात विद्यार्थी आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून जंतर-मंतर आणि मध्य दिल्लीच्या इतर परिसरात आंदोलन केली जात आहेत. वारंवार होणाऱ्या पेपर फुटीप्रकरणी सरकारनं जबाबदारी घ्यावी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा अशी विद्यार्थी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

1500 लोकांचा मृत्यू, 5 मिनिटांत बॉडी गायब; गडचिरोलीतील मृत्यूंबाबत राऊतांचा मोठा आरोप

मूड खराब झाल्यास मिळणार सुट्टी; भारतातही पॉलिसी राबवणार, उद्योगपतींचे संकेत

जरांगे प्रवास करत असलेल्या डिफेंडरवरून वाद; महागड्या गाडीतून जरांगेंचा आरक्षण दौरा

सरकारी-खासगी शाळा दिपकेंच्या रडारवर ; CJPचं शाळा सुधार आंदोलन

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारनं मराठा समाजासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT