Supreme Court land ownership verdict Saam TV marathi
देश विदेश

जमीन मालकांसाठी सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल, जाणून घ्या 'हा' महत्त्वाचा नियम

Supreme Court Land Ownership Verdict: सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, जमिनीच्या मालकी हक्कावर वास्तविक वाद असल्यास सरकार केवळ प्रशासकीय किंवा संक्षिप्त प्रक्रियेद्वारे नागरिकाला बेदखल करू शकत नाही.

Namdeo Kumbhar

Supreme Court land ownership verdict : जमिनीच्या मालकी हक्कावरून (Title Dispute) सरकार आणि नागरिकांमध्ये वाद निर्माण झाल्यास प्रशासकीय अधिकारांचा वापर करून नागरिकांना थेट बेदखल (Summary Eviction) करणाऱ्या सरकारी यंत्रणांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने एका महत्त्वाच्या खटल्यात स्पष्ट केले की, जर एखाद्या व्यक्तीकडे जमिनीचा दीर्घकालीन ताबा असेल, नोंदणीकृत खरेदीखत (Registered Sale Deed) आणि महसूल नोंदी (Mutation) उपलब्ध असतील, तर सरकार अशा प्रकरणात परस्पर किंवा प्रशासकीय बळाचा वापर करून ताबा हटवू शकत नाही.

आंध्र प्रदेशातील ६५ एकर जमिनीच्या वादावर सुनावणी करताना न्यायालयाने महत्त्वाचे विधान केले. कोर्टाने स्पष्ट केले की, दीर्घकालीन ताबा आणि खरेदीखतांचा वाद हा एक गंभीर (Bona Fide) विषय आहे. अशा वेळी सरकारने जमीन 'असाइन्ड' (Assigned Land) किंवा आपली असल्याचा दावा केला, तरीही आधी दिवाणी न्यायालयात (Civil Court) तो पुरावा सिद्ध करावा लागेल; फक्त प्रशासकीय आदेश काढून नागरिकांना बेदखल करण्याचा मार्ग सरकारला अवलंबता येणार नाही.

सरकार स्वतःच्याच दाव्यावर स्वतःच न्यायाधीश बनून नागरिकांवर थेट बेदखलीची कारवाई करू शकत नाही. १९२० सालापासून सुरू असलेला ताबा आणि लागोपाठ झालेली नोंदणीकृत खरेदीखते (Registered Deeds) या गोष्टींकडे दुर्लक्ष करून 'संक्षिप्त बेदखली प्रक्रिया' (Summary Eviction) राबवता येणार नाही. जर सरकारला जमिनीवर आपला अधिकार सिद्ध करायचा असेल, तर त्यांना योग्य त्या दिवाणी न्यायालयात जाऊन खटला चालवावा लागेल, असे कोर्टाने स्पष्ट केले.

कोर्टाने या प्रकरणात दीर्घकाळापासून असलेल्या ताब्याला (Long Possession) अत्यंत महत्त्वाचे मानले. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्टपणे नमूद केले की, फक्त दीर्घकाळापासून असलेला ताबा (Long possession itself) हीच अशी बाब आहे जी प्रशासनाला संक्षिप्त कारवाई (Summary Eviction) करून कोणालाही बेदखल करण्यापासून रोखते. याचा अर्थ असा अजिबात नाही की, एखादी व्यक्ती दीर्घकाळापासून जमिनीचा वापर करत असेल तर ती आपोआप त्या जमिनीची मालक बनते.

निकालाचा अर्थ काय?

जर एखाद्या जमिनीवर एखाद्याचा दीर्घकाळापासून ताबा असेल, नोंदणीकृत खरेदीखते (Registered Sale Deeds) आणि महसूल नोंदी (Mutation Entries) उपलब्ध असतील, तर असा गंभीर मालकी हक्काचा वाद (Title Dispute) प्रशासकीय स्तरावर घाईघाईने किंवा संक्षिप्त कारवाई करून सोडवणे अजिबात योग्य नाही.

सर्वोच्च न्यायालयाने या खटल्यात खासगी व्यक्तींकडे असलेली रजिस्टर्ड खरेदीखते (Registered Sale Deeds) आणि महसुली नोंदी (Mutation Entries) यांची गंभीर दखल घेतली. याशिवाय, अनेक जुन्या शासकीय मंजुऱ्या आणि म्यूटेशन नोंदींची माहिती आधीपासूनच सरकारच्या आणि प्रशासनाच्या आधीच निदर्शनास होती, ही बाबसुद्धा न्यायालयाने या प्रकरणात स्पष्टपणे नमूद केली.

या निकालाचा सामान्य जमीन मालकांवर काय परिणाम होईल?

सरकारी जमिनीवर केलेला बेकायदेशीर ताबा आणि जमिनीच्या मालकी हक्काचा वाद (Title Dispute) या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जर एखाद्या व्यक्तीने सरकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा केला असेल आणि तिथे सरकारची मालकी स्पष्ट असेल, तर सरकार प्रशासकीय कारवाई (Summary Proceedings) करून तो ताबा हटवू शकते. पण जर एखाद्या नागरिकाकडे जमिनीची जुनी रजिस्टर्ड खरेदीखते (Registered Sale Deeds), महसुली नोंदी (Mutation) आणि अनेक वर्षांचा ताबा असेल, तर सरकार स्वतःच न्यायाधीश बनून ती जमीन सरकारी असल्याचे घोषित करू शकत नाही आणि लोकांना तातडीने बेदखल करू शकत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : धनगर आरक्षणासाठी सरकारला पुन्हा इशारा

Swine flu cough: H1N1 झाल्यानंतर खोकला किती दिवस राहतो?

पुढील ५ दिवस 'या' जिल्ह्यांत मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा, तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडणार का?

Accident: यमुना एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; डिव्हायडर तोडून ट्रक कारला धडकला, ४ जणांचा मृत्यू

Singer Complaint: प्रसिद्ध मराठी गायिकेवर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT