Shruti Vilas Kadam
जपानी वॉकिंग ही चालण्याची एक पद्धत असून यात चालण्याचा वेग, शरीराची पोझिशन आणि हातांची हालचाल याकडे विशेष लक्ष दिले जाते.
चालताना पाठ आणि मान सरळ ठेवावी. खांदे रिलॅक्स ठेवून पुढे पाहत चालल्यास शरीराची पोझिशन योग्य राहण्यास मदत होते.
चालताना हातांना नैसर्गिकपणे पुढे-मागे हलवा. हातांची योग्य हालचाल चालण्याची गती आणि शरीराची हालचाल सुधारण्यास मदत करू शकते.
नवशिक्यांनी सुरुवातीला आरामदायी वेगाने चालावे. शरीराला सवय झाल्यानंतर हळूहळू चालण्याचा वेग वाढवता येतो.
चालताना टाच जमिनीवर टेकवून नंतर पायाच्या पुढील भागावर वजन द्या. पावले नैसर्गिक आणि आरामदायी असावीत.
वजन व्यवस्थापनासाठी केवळ काही दिवस चालण्यापेक्षा नियमित शारीरिक हालचाल, संतुलित आहार आणि पुरेशी झोप यांचा समावेश असलेली जीवनशैली अधिक महत्त्वाची आहे.
चालताना चक्कर येणे, छातीत दुखणे किंवा असह्य वेदना जाणवल्यास व्यायाम थांबवा. नवशिक्यांनी आपल्या क्षमतेनुसार सुरुवात करावी.