Sakshi Sunil Jadhav
रात्री उरलेल्या दोन वाट्या भातापासून स्वादिष्ट आणि मऊ बर्फी तयार करता येते.
दोन वाट्या शिजवलेला भात, २०० ग्रॅम मावा, २५० ग्रॅम दूध, साखर, तूप, नारळ आणि ड्रायफ्रुट्स लागतील.
भातात थोडं दूध घालून मिक्समध्ये फिरवा, मात्र पेस्ट खूप बारीक किंवा पातळ करू नका.
कढईत तूप घालून भाताची पेस्ट ५ ते ७ मिनिटं स्लो फ्लेमवर भाजल्याने मिश्रणाला छान चव आणि सुगंध येतो.
भाताचे मिश्रण घट्ट झाल्यावर उरलेलं दूध, मावा, साखर आणि नारळ घालून सतत ढवळत राहा.
मिश्रण कढई सोडून एकत्र येऊ लागलं की त्यात उरलेलं तूप आणि वेलची पावडर घालावी.
ताटाला तूप लावून त्यात बर्फीचे मिश्रण पसरवा आणि वरून काजू- बदामाचे तुकडे घाला.
मिश्रण थंड झाल्यावर फ्रिजमध्ये २ ते ३ तास ठेवल्याने बर्फी व्यवस्थित सेट होऊन सहज कापता येतं.
भात जास्त ओला असल्यास दूध कमी वापरा आणि मिश्रण चांगलं घट्ट झाल्यावरच ताटात पसरवा, त्यामुळे बर्फीचा आकार छान राहतो.