Stray Dogs Poisoned Saam Digital
देश विदेश

'धोकादायक कुत्र्यांना इंजेक्शन देऊन मारा', सुप्रीम कोर्टाचे निर्देश

Stray Dog Attack Cases : भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर सुप्रीम कोर्टाने कठोर भूमिका घेत धोकादायक कुत्र्यांना इंजेक्शन देऊन मारण्याचे निर्देश दिले आहेत. सार्वजनिक ठिकाणांहून कुत्र्यांना हटवण्याचे आदेशही कायम ठेवण्यात आले आहेत.

Namdeo Kumbhar

Supreme Court stray dog order Latest news : भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या दहशतीवर आता सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिलाय. धोकादायक कुत्र्यांना थेट मारण्याचे आदेशच सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. श्वानप्रेमींच्या याचिका फेटाळताना सुप्रीम कोर्टानं संबंधित यंत्रणांची कशी कान उघाडणी केलीय पाहूयात. या रिपोर्टमधून.

भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या दहशतीवर आता सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिलाय. सार्वजनिक ठिकाणांहून कुत्र्यांना हटवण्याच्या नोव्हेंबर 2025 च्या आदेशात बदल करण्यास न्यायालयानं स्पष्ट नकार दिलाय. इतकंच नव्हे तर सर्वोच्च न्यायालयानं प्राणी प्रेमींच्या सर्व याचिका फेटाळून लावल्यात. तसंच, जमिनीवरील वास्तवाकडे आम्ही डोळेझाक करू शकत नाही. लहान मुलांसह वृद्धांच्या सुरक्षेला आम्ही सर्वोच्च प्राधान्य देतो, असंही न्यायालयानं नमूद केलंय. दरम्यान, भटक्या कुत्र्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं काय निर्देश दिले आहेत पाहूयात...

भटक्या कुत्र्यांबाबत सुप्रीम कोर्टाचे निर्देश

- धोकादायक कुत्र्यांना इंजेक्शन देऊन मारा

- शाळा, रुग्णालयं, बस आणि रेल्वे स्थानकांतून भटक्या कुत्र्यांना तातडीनं हटवा

- पकडलेल्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये पाठवा, पुन्हा त्याच ठिकाणी सोडू नका

- कुत्र्यांची संख्या मर्यादित करण्यासाठी पुनर्वसन आणि नसबंदीचा जुना निर्णय कायम

- महामार्ग आणि एक्स्प्रेसवेवरील अपघात टाळण्यासाठी कुत्र्यांना हटवण्याचे NHAIला निर्देश

खरंतर, गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढलंय. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांचा अभाव असल्यानं न्यायालयाने तीव्र चिंता व्यक्त केली. इतकंच नव्हे तर निर्देशांचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिलाय. त्यामुळे आतातरी भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणाबाबत संबंधित यंत्रणा कारवाई करणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

ब्युरो रिपोर्ट, साम टिव्ही न्यूज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा

Maternal death: धक्कादायक घटना! इंटरनेटवरील व्हिडिओ पाहून पत्नीची घरातच प्रसूती करण्याचा प्रयत्न, तरुण महिलेचा दुर्दैवी मृत्यू

ट्रेडिशनल टू मॉडर्न, मंगळसूत्राचे लेटेस्ट ट्रेडिंग 5 पॅटर्न, वटपौर्णिमेनिमित्त खरेदी करा

Eetha controversy: श्रद्धा कपूरच्या 'ईठा'वर विठाबाईंच्या कुटुंबीयांची नाराजी; नाव बदला, अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा

Maharashtra : सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांसह ९ अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई, तडकाफडकी केलं निलंबन; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT